Menu Close

मदरशांना दिले जाणारे अर्थसाहाय्य बंद करावे – अधिवक्ता मोतिसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

हिन्दू जनजागृति समिति आयोजित विशेष संवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की..

‘मदरशांतून आतंकवादी सिद्ध होतात का ?’

मुंबई – राजस्थानमधील कन्हैयालाल आणि अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करणारे हे मदरशांतून सिद्ध झालेले होते. इतकेच नव्हे, तर देशभरातील सर्व कैद्यांची माहिती घेतल्यास त्यातील बहुतांश मुसलमान मदरशांतून शिकलेले असल्याचे समोर येते. यातून ‘मदरशांतून आतंकवादी सिद्ध होतात का ?’, हा प्रश्न उरणार नाही, तसेच सर्वोच्च न्यायालयाने ‘मदरसे हे शिक्षणाचे वा प्राथमिक शिक्षणाचे केंद्र नसून ते धार्मिक प्रथा-परंपरा शिकवणारी केंद्रे आहेत’, असा स्पष्ट निर्णय दिलेला आहे. त्याचा आधार घेऊन केंद्र आणि राज्य सरकार यांनी मदरशांना शिक्षणाच्या नावाखाली अर्थसाहाय्य देणे, मदरसे उघडणे आणि मुलांना गोळा करणे आदी पूर्णपणे बंद करावे.

अधिवक्ता श्री. मोतिसिंह राजपुरोहित

यासह सर्वांना समान शिक्षण देणारे शैक्षणिक धोरण देशभरात कठोरपणे लागू करावे. त्यामुळे देशात कट्टरतावादी मानसिकता असलेले आक्रमणकारी सिद्ध होणार नाहीत, असे प्रतिपादन राजस्थान उच्च न्यायालयातील अधिवक्ता तथा अभ्यासक मोतिसिंह राजपुरोहित यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘काय मदरसे आतंकवादाची केंद्रे होत आहेत ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ संवादात ते बोलत होते.

मदरशांमध्ये मुलांना कट्टरतावादाचे शिक्षण दिले जाते ! – दीपक शर्मा, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, नवी देहली

श्री. दीपक शर्मा

देहलीतील सीलमपूर या मुसलमानबहुल क्षेत्रातील मदरशांचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला धर्मांधांनी बंदी बनवून त्याला मारहाण केली. सुदैवाने कन्हैयालालप्रमाणे त्याची हत्या झाली नाही. याच ठिकाणी वर्ष २०२० मध्ये भीषण दंगली झाल्या होत्या. त्यात ‘आम आदमी पक्षा’चा नगरसेवक ताहिर हुसेन याला मुख्य आरोपी म्हणून पकडले होते. ताहिर हुसेन याचा भारतातील ३० मदरशांशी संबंध होता. मदरशांमध्ये मुलांना बाहेरच्या जगाशी संबंध येऊ न देता कट्टरतावादाचे शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे देहलीतील पुढील परिस्थिती भीषण होणार आहे.


हे पहा –

हिन्दू जनजागृति समिति आयोजित ? विशेष संवाद
? चर्चा हिन्दू राष्ट्र की..

? क्या मदरसे बन रहे हैं आतंकवाद के केंद्र ?


देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी सत्यशोधन समितीने केलेल्या अभ्यासात आतंकवादी आक्रमणाचा संबंध मदरशांशी आढळून आला आहे. आसाम राज्यातही काही मदरशांचे संबंध ‘अल्-कायदा’ या आतंकवादी संघटनेशी उघड झाल्यावर तेथील मदरसे पाडले, तसेच मदरशांविषयी नवीन कायदा करून सर्व मदरशांचे शाळेत रूपांतर केले आहे. याचे सर्व राज्य सरकारांनी अनुकरण केले पाहिजे. एकट्या उत्तरप्रदेशमध्ये ४० सहस्र मदरसे अनधिकृत आहेत, तर देशात ही संख्या कितीतरी पटीने अधिक असेल. येथील मदरशांचे ‘डिजिटलायजेशन’ केल्यावर तेथे १०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. त्यामुळे सर्व मदरशांचे सर्वेक्षण झालेच पाहिजे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *