उज्जैन : ब्रह्मलिन धर्मसम्राट शंकराचार्य स्वामी करपात्रीजी महाराज यांनी स्थापन केलेली अखिल भारतीय रामराज्य परिषदेचे राष्ट्रीय संघटन महामंत्री स्वामी त्रिभुवनदासजी यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी त्यांना संपूर्ण प्रदर्शन दाखवून त्याची माहिती सांगितली. त्यानंतर समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र या विषयावर चर्चा केली.
या वेळी बोलतांना स्वामी त्रिभुवनदासजी म्हणाले की, धर्मसम्राट करपात्री महाराज यांनी या देशात रामराज्य स्थापन करण्यासाठी अखिल भारतीय रामराज्य परिषद पक्षाची स्थापना केली आहे. या विषयावर करपात्री महाराजांनी एक पुस्तकही लिहिलेले आहे. त्याचा अभ्यास करून सनातनने अनुकरण केल्यास लाभ होईल. सनातन संस्था करत असलेले कार्य सामान्य कार्य नाही. हे कार्य कोणीही करून शकत नाही. यासाठी मोठे सामर्थ्य लागते. हिंदु राष्ट्राचे कार्य असो कि अखंड हिंदु राष्ट्राचे कार्य, या कार्यासाठी आपण एकत्र येऊन कार्य करूया.
या वेळी स्वामी त्रिभुवनदासजी महाराज यांना सनातन संस्थेच्या वतीने श्रीरामे चित्र भेट देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात