Menu Close

आमदार टी. राजासिंह यांची कारागृहातून मुक्तता करावी – मंगेश खांदेल, हिंदु जनजागृती समिती

आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

यवतमाळ, २० सप्टेंबर (वार्ता.) – गोशामहल (तेलंगाणा) विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्रास दिला जात आहे. तेलंगाणा सरकारची ही कृती राज्यघटना आणि कायदा विरोधी असून नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचे हनन करणारी आहे; म्हणून टी. राजासिंह यांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी केंद्र शासन आणि तेलंगाणाचे राज्यपाल यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी १८ सप्टेंबर या दिवशी येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात करण्यात आली. ‘टी. राजासिंह यांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी त्यांची कारागृहातून मुक्तता करावी’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे मंगेश खांदेल यांनी केली.

या आंदोलनात योग वेदांत सेवा समिती, महिला उत्थान मंडळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था या संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलनातील मागण्यांवर २५० जणांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या.

क्षणचित्र – वादळी पावसाची स्थिती असतांनाही आंदोलन संपल्यावर पाऊस आला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *