Menu Close

भारतियांवर हलाल अर्थव्यवस्था थोपवली जात आहे – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

नोएडा (उत्तरप्रदेश) – आज फॅशन उद्योगामध्ये हलाल प्रमाणपत्र आहे. ‘डेटिंग’ संकेतस्थळे हलाल आहेत. ‘मायक्रोव्हेव’सारख्या इलेक्टॉनिक वस्तू हलाल प्रमाणित असतात, निवासी सोसायटी हलाल प्रमाणित होत आहेत. रुग्णालये हलाल प्रमाणित होत आहेत. एवढेच नाही, तर हलाल पर्यटन नावाचा नवीन प्रकार बनत चालला आहे. त्यामुळे जो पर्यटनावर व्यय होणारा पैसा हा हलाल प्रमाणपत्र असणाऱ्या उपाहारगृहांवर व्यय होईल. अशा प्रकारची व्यवस्था आज विश्वभर चालू आहे. भारताच्या पहिल्या हलाल क्रूजचा १४ ऑगस्ट २०२२ या दिवशी आरंभ झाला. भारताचे सर्व मॅकडोनॉल्ड उपाहारगृह हे हलाल प्रमाणित आहेत. बहुतांश ग्राहक हिंदु असतांना त्यांना हलाल खाण्यास मॅकडोनाल्ड बाध्य करत आहे. अशा प्रकारे अनेक बहुराष्ट्रीय आस्थापनांची उपाहारगृहे भारतात चालू आहेत. अशा प्रकारे हलाल प्रमाणित पदार्थांचे सेवन आणि वापर यांच्या माध्यमातून आपल्यावर हलाल अर्थव्यवस्था थोपवली जात आहे. असे असले तरी युरोपमधील इंग्लंड, नेदरलॅड्स समवेत ७ देशांमध्ये हलाल मांसावर प्रतिबंध आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

श्री. रमेश शिंदे

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त समितीच्या वतीने सेक्टर १२ मधील भावराम देवरास शाळेमध्ये ‘हलाल जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या मार्गदर्शनाचा ३५० हून अधिक धर्मप्रेमींनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फोनरवाचे माजी अध्यक्ष श्री. एन्.पी. सिंह  होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उमेश यांनी केले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *