Menu Close

आरे (देवगड जि. सिंधुदुर्ग) येथे राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा

देवगड – हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त हिंदु राष्ट्र संकल्प मासाच्या अंतर्गत तालुक्यातील आरे गावातील श्री देव आरेश्वर मंदिरानजीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धर्माभिमानी हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेची  प्रतिज्ञा घेतली. या वेळी धर्माभिमानी हिंदूंनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् !’ आणि ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र ! हिंदु राष्ट्र !’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या वेळी गावातील प्रतिष्ठित, तसेच धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धर्माभिमानी हिंदू हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतांना
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील स्वच्छता करतांना ग्रामस्थ आणि धर्माभिमानी

या वेळी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता झाल्यानंतर श्री. दत्ताराम कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. धर्माभिमानी श्री. भाऊ कदम आणि श्री. दत्ताराम कदम यांनी स्वच्छतेचे साहित्य उपलब्ध केले.

हिंदु जनजागृती समितीचे डॉ. रविकांत नारकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख करून देतांना विविध स्तरांवर चालू असलेल्या समितीच्या कार्याविषयी सांगितले, तसेच समितीच्या धर्म आणि राष्ट्र रक्षण याच्या कार्यात योगदान देण्यास उत्स्फूर्तपणे आणि तळमळीने राष्ट्र आणि धर्मप्रेमी कृतीप्रवण होत असल्याचे सांगितले.

हिंदु जनजागृती समितीचे डॉ. रविकांत नारकर समितीच्या कार्याची ओळख करून देतांना

हिंदु जनजागृती समितीचे श्री. विष्णु कदम यांनी हिंदूंचे धर्मांतर, लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरण आणि गोहत्या आदी हिंदु धर्म आणि हिंदूंवर असलेल्या संकटांची माहिती दिली. तसेच या कार्यात सर्व हिंदूंनी सहभागी होण्यासाठी त्यांनी आवाहन केले.

अभिप्राय

१. श्री.पांडुरंग कदम – हिंदु जनजागृती समितीचे युवा पिढीमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम जागृत करण्यासाठी होत असलेले प्रयत्न ऐकून खूप चांगले वाटले. स्वसंरक्षण प्रशिक्षण, प्रथमोपचार आणि धर्मशिक्षण या सर्व गोष्टींचीही नितांत आवश्यकता आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये १९९३ मध्ये झालेल्या बॉंबस्फोटाच्या परिस्थितीच्या वेळी विदारक स्थिती पाहिली. त्यामुळे अशा प्रकारे समाजसाहाय्य करण्याचे प्रयत्न समिती राबवत असल्याचे पाहून आमच्याही गावांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम नियमित चालू करावेत. समितीच्या पुढील कार्यास माझ्या शुभेच्छा !

२. श्री. सूर्यकांत साळुंके (निवृत्त प्राथमिक शिक्षक) – हिंदु जनजागृती समितीचे धर्म आणि राष्ट्र यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील चालू असलेले कार्य ऐकून खूप समाधान वाटले. जे कार्य आमच्यासारख्या शिक्षकांनी करून युवा पिढी निर्माण करावी, अशी अपेक्षा असतांना, ते कार्य समितीने करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्याला तोड नाही. समितीच्या संपर्कात राहून ‘जे आम्हाला समजेल ते’ समाजात जाऊन कळकळीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू.

३. मनीषा श्री. साळुंके – रामनाथी, गोवा येथील आश्रमास भेट देऊन कार्याची व्यापकता समजून घ्यायची आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *