Menu Close

अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे एका हिंदु मुलाचे बळजोरीने धर्मांतर !

  • हिंदु मुलाच्या वडिलांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव

  • हिंदु मुलाची आई मुसलमान असल्याचे निष्पन्न !

मुसलमान आक्रमकांचे वंशज आजही भारतात कार्यरत असून ते हिंदूंच्या धर्मांतराच्या कारवायांत गुंतले आहेत, हेच यातून स्पष्ट होते. हे थांबवण्यासाठी त्यांच्यावर वचक निर्माण होईल, अशी कृती सरकार कधी करणार ? -संपादक 

जगबीर कोरी आणि हसीना बानो

अयोध्या – जगबीर कोरी या हिंदु धर्मीय व्यक्तीच्या लहान मुलाचे बळजोरीचे धर्मांतर करून त्याची सुंता केल्याची घटना समोर आली आहे. शाहनवाजपूर येथील रहिवासी असलेले जगबीर कोरी यांनी इस्लाम स्वीकारला नाही; म्हणून शिरच्छेद करण्याच्या धमक्या मिळत आहेत. या प्रकरणी त्यांनी पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तकार केली आहे.

जगबीर कोरी यांच्या एका नातेवाईकाला १२ वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकावर एक मुलगी रडतांना दिसली. त्या मुलीने स्वतःचे नाव पूजा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या मुलीचा विवाह जगबीर कोरी यांच्यासोबत लावण्यात आला. ९ वर्षे सर्व काही ठीक चालले होते. त्यानंतर जगबीर कोरी यांना कळले की, त्यांची पत्नी पूजा हिंदु नसून हसीना बानो आहे. त्यानंतर एक दिवस अचानक मुलीचे आई, वडील आणि भाऊ जगबीर कोरी यांच्या घरी आले. त्यांनी जगबीर यांच्यावर इस्लाम स्वीकरण्यासाठी दबाव आणण्यास चालू केले. त्यांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली. जगबीर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्या लोकांनी बळजोरीने त्यांच्या मुलाला इस्लाम स्वीकारायला लावला आणि त्याची सुंता करून घेतली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *