Menu Close

हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना जामीन देण्यासह सुरक्षा मिळण्यासाठी इंदौर येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे प्रशासनाला निवेदन

        आमदार टी. राजा सिंह

इंदौऱ(मध्यप्रदेश) – भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना २५ ऑगस्ट या दिवशी कथित आक्षेपार्ह विधानावरून अटक करण्यात आली. त्यांना ठार मारण्याची धमकीही जिहाद्यांकडून देण्यात आली आहे. यामुळे त्यांना जामीन देऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी, या मागणीसाठी येथे हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे केंद्रीय गृहमंत्र्यांना देण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, श्री. श्रीराम काणे; हिंदु महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. जितेंद्रसिंह ठाकुर, अर्जुन पवार; हिंदु युवा संघटनेचे सर्वश्री निर्मल पाटीदार, राजू पाटीदार, दयाराम अग्रवाल; विश्‍व हिंदु परिषदचे श्री. राजेश शर्मा, सहयोग संस्थेचे श्री. अवधेश यादव आणि सनातन संस्थेच्या सौ. पुष्पा सावंत उपस्थित होत्या.

या निवेदनामध्ये पुढे असेही म्हटले आहे की, टी. राजा सिंह यांना तेलंगाणा सरकारकडून न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांचे सर्व खटले महाराष्ट्र, कर्नाटक अथवा गोवा या शेजारी राज्यांत हस्तांतरित करण्यात यावेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *