सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनार्याचा काही भाग ‘वक्फ बोर्डा’च्या कह्यात जाण्याची शक्यता !
कुडाळ (सिंधुदुर्ग) – महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा धर्मांतराचे केंद्र होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० ते ४५ टक्के समुद्रकिनार्याचा भाग ‘वक्फ बोर्डा’च्या मालकीचा होत आहे, अशी स्थिती आहे. असे असतांना आपण जर शांततामय जिल्ह्यात रहातो, असे म्हणत असू, तर ही वादळापूर्वीची शांतता आहे, हे आपण आता लक्षात घ्यायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी कुडाळ येथे केले. हिंदु जनजागृती समितीला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र संकल्प’ अभियान राबवण्यात येत आहे. या निमित्ताने २४ सप्टेंबर या दिवशी कुडाळ एम्.आय्.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. मनोज खाडये यांनी हिंदु राष्ट्र आणि धर्मनिरपेक्षता (सेक्युलॅरिझम्) याविषयी उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘जेव्हा एक हिंदु घटतो (अल्प होतो), तेव्हा एका हिंदुमध्ये घट होते, असे नसून एक शत्रू वाढतो. त्यामुळे असे आपण किती शत्रू वाढवणार आहोत ? यामुळेच आपल्या देशात आज ७ राज्यांत हिंदू ७ टक्केच राहिले आहेत. आज ‘१०० कोटी हिंदूंचा खात्मा करू’, अशी भाषा वापरणारे औवेसी उघडपणे फिरत आहेत; पण मुसलमानांचे वास्तव लोकांसमोर ठेवणारे आमदार टी. राजा सिंह मात्र कारागृहात आहेत. आज देशात सर्वाधिक संपत्तीमध्ये प्रथम क्रमांक सैन्यदल, दुसरा क्रमांक रेल्वे विभाग, तर तिसरा क्रमांक ‘वफ्फ बोर्डा’चा लागतो.’’
या वेळी श्री. खाडये यांनी मंदिरांच्या विदारक स्थितीकडे उपस्थितांचे विविध उदाहरणांच्या माध्यमातून लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘आज पंढरपूर मंदिरात २ महिला पुजारी असून या वेळी मासिक धर्मही या महिलांकडून पाळला जात नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणार्या देवालयांमधील १६ सहस्र एकर भूमीचा थांगपत्ता लागत नाही. मंदिरांच्या माध्यमातून धर्म पद्धतशीरपणे संपवण्याचे षड्यंत्र सर्वपक्षीय राज्यकर्ते करत आहेत. या विरोधात हिंदु जनजागृती समिती लढा देत आहे. यामुळे उत्तराखंड न्यायालयाने ‘चारधाम’ मुक्त करून भक्तांच्या कह्यात दिली आहेत. हिंदु जनजागृती समितीला सगळीकडेच असे करायचे आहे. हिंदु जनजागृती समितीच्या या लढ्यात आपणही सहभागी व्हा ! आपल्याला वेळ देणे शक्य नसल्यास ई-मेलच्या माध्यमातून तुमच्या धर्माविषयीच्या भावना शासनापर्यंत पोचवा.’’
या वेळी उपस्थितांना धर्माचरणाचे महत्त्व विशद करतांना श्री. खाडये यांनी सांगितले की, धर्माचरणाची कास धरल्याविना जीवनात आनंद मिळत नाही. भगवंताचे अधिष्ठान वैयक्तिक जीवनासह धार्मिक आणि राष्ट्रीय जीवनातही ठेवले पाहिजे.
क्षणचित्रे
१. या वेळी उपस्थित धर्माभिमानी हिंदूंनी हिंदु राष्ट्राची शपथ घेतली.
२. या वेळी ६२ धर्माभिमानी उपस्थित होते. यामध्ये कुडाळ एम्.आय.डी.सी.तील उद्योजकांचा मोठा सहभाग होता.
३. सर्वांनी शेवटपर्यंत उपस्थित राहून मनापासून विषय समजून घेतला. यातील काही जणांनी कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर श्री. खाडये यांच्याशी चर्चा केली.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात