Menu Close

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘हिंदु धर्मशिक्षण संस्कारवर्ग उपासना’ पुस्तकाचे प्रकाशन !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतांना उपस्थित धर्मप्रेमी

यळगुड (जिल्हा कोल्हापूर) – हातकणंगले तालुक्यातील यळगुड येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रामनगर येथील श्रीराम मंदिरासमोर ‘हिंदु धर्मशिक्षण संस्कारवर्ग उपासना’चे पुस्तक प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री दत्तपीठ तमनाकवाडा येथील प.पू. सद्गुरु श्री सच्चिदानंद बाबा, उत्तराखंड येथील प.पू. शिवानंद स्वामी, निपाणी येथील विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी, विजापूर येथील प.पू. प्रभुलिंग स्वामीजी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात श्री. अतुल पाटील आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. रावसाहेब देसाई यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी हिंदुत्वनिष्ठ श्री. निळकंठ माने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. बाळकृष्ण पाटील, माळी समाजाचे अध्यक्ष श्री. गजानन माळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संकेत कुलकर्णी (ध्वनीक्षेपकासमोर)

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंगांच्या चित्रांचे प्रदर्शन, जुन्या काळातील काही नाण्यांचे, तसेच विविध ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !

या सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीचे श्री. संकेत कुलकर्णी यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ दिली. यासाठी २५० धर्मप्रेमी उपस्थित होते.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारावरील फलक

विशेष

१. उत्तराखंड येथील प.पू. शिवानंद स्वामी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी चौकशी करून समितीच्या कार्याचे कौतुक केले.

२. कार्यक्रमस्थळी काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार, हिंदु राष्ट्राची आवश्यकता, तसेच धर्मशिक्षण देणार्‍या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *