अमरावती येथे पत्रकार परिषद
अमरावती – मागील २० वर्षे सातत्याने केलेल्या जागृतीमुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन रोखण्यासाठी राज्यातीलच नव्हे, तर भारतभरातील हिंदू कृतीशील होत आहेत. अंधश्रद्धा कायद्याचा विरोध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या खांद्याला खांदा लावून वारकरी संप्रदायाने पुढाकार घेऊन प्रयत्न केले. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अविरत कार्यरत असणारी हिंदु जनजागृती समिती सर्व हिंदूंसाठी आधारस्तंभच आहे, असे आशीर्वादपर मार्गदर्शन ह.भ.प. श्यामसुंदर निचीत महाराज यांनी करून समितीच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समितीच्या द्विदशकपूर्ती निमित्ताने राबवण्यात येणार्या ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’ची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अभियानाची माहिती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली. या वेळी समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे आणि रणरागिणी शाखेच्या जिल्हा समन्वयक सौ. अनुभूती टवलारे उपस्थित होत्या.
अमरावतीत आतापर्यंत ४६ ठिकाणी हिंदु राष्ट्र संकल्प प्रतिज्ञा घेण्यात आली. २ ठिकाणी स्मारक स्वच्छता करण्यात आली. एका ठिकाणी हिंदूसंघटन मेळावा पार पडला. १५१ ठिकाणी प्रतिज्ञा घेण्यात आली, ५ स्मारकांच्या ठिकाणची स्वच्छता, ३० ठिकाणी व्याख्याने, २५ विविध क्षेत्रांतील हिंदुत्वनिष्ठांसमवेत बैठका घेण्याचे नियोजन आहे, अशी माहिती अमरावती समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी दिली.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात