हे प्रकरण म्हणजे लव्ह जिहाद नसल्याचे पोलिसांचे पत्रक !
- भारतात लव्ह जिहादचा भस्मासुर झालेला असतांना आणि या प्रकरणात स्पष्टपणे तसेे दिसत असतांना पोलिसांनी कुणाच्या दबावामुळे हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’ नसल्याचे पत्रक काढले आहे ?
- नेते किंवा पोलीस-प्रशासन यांनी वारंवार ‘लव्ह जिहाद नाही’ असे म्हणणे, हे धर्मांधांचे लांगूलचालन तर आहेच आणि यासह लव्ह जिहादला बळी पडलेल्या लक्षावधी मुलींचा हा अवमान आहे !
- लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदूंचा वंशविच्छेद होत असतांना पोलिसांनी अशी प्रकरणे पुढे आल्यावर ती नाकारणे, हे दुर्दैव ! -संपादक
मुंबई – बुरखा घालण्यास आणि इस्लामप्रमाणे धर्मपालन करण्यास नकार दिला; म्हणून मुंबईमध्ये इक्बाल शेख याने हिंदु पत्नीची दिवसाढवळा गळा चिरून केलेली हत्या हे केवळ आणि केवळ ‘लव्ह जिहाद’चे नवीन उदाहरण होय. पीडित तरुणी हिंदु होती. इस्लामनुसार आचरण करावे, यासाठी शेख वारंवार तिला आग्रह करत होता. बुरखा न घातल्यामुळे त्याने तिची हत्या केली. या प्रकरणाची ‘लव्ह जिहाद’च्या दृष्टीने चौकशी करून इक्बाल शेख याला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ‘ट्वीट’ करून सरकारकडे केली.
बुरखा घातला नाही म्हणून मोहम्मद इक्बाल ने केली हिंदू पत्नीची हत्या… मुंबईत लव्ह जिहादची संतापजनक घटना. pic.twitter.com/uFFHDOtFTW
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 27, 2022
२७ सप्टेंबर या दिवशी पोलीस-प्रशासनाने ‘हे प्रकरण म्हणजे ‘लव्ह जिहाद’ नाही’, अशा आशयाचे पत्रक काढले आहे. (सामाजिक वातावरण बिघडू नये; म्हणून पोलीस मुद्दामहून अशा प्रकारे पत्रक काढतात का ? धर्मांध हिंदूंवर दंगली आणि विविध जिहाद या माध्यमांतून करत असलेल्या आघातांमुळे वातावरण बिघडलेलेच आहे, हे ते का लक्षात घेत नाहीत ? – संपादक)
स्रोत: दैनिक सनातन प्रभात