नाशिक – पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. अशा लोकांचा बंदोबस्त केलाच पाहिजे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ सप्टेंबर या दिवशी नाशिक येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘या राज्यात आणि देशात कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तान झिंंदाबादच्या घोषणा देणे खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशा घोषणा देणार्यांना या देशात रहाण्याचाच अधिकार नाही. त्यामुळे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर घातलेली बंदी योग्य आहे. केंद्र आणि राज्य यांच्या गृहविभागांचे या प्रकरणावर बारीक लक्ष आहे. या देशात राष्ट्रद्रोही विचार कुणालाही पसरवता येणार नाहीत आणि पसरवू दिले जाणार नाहीत.’’
#WATCH | PFI which raises 'Pakistan Zindabad' slogans doesn't have any right to raise such slogans in the country. Home Ministry will take action on that. Central govt has taken the right decision. It's a country of patriots: Maharashtra CM Eknath Shinde on #PFIban pic.twitter.com/itp95p6ikl
— ANI (@ANI) September 28, 2022
स्रोत: दैनिक सनातन प्रभात