-
सेलू (परभणी) येथे ‘श्री रामबाग गणेशोत्सव मंडळा’चा उपक्रम !
-
उपस्थितांनी स्वरक्षण करण्याचा संकल्प करून हिंदु राष्ट्रासाठी शपथ घेतली !
-
८५० महिलांची उपस्थिती
परभणी – गणेशोत्सवाच्या निमित्ताने परभणी जिल्ह्यातील सेलू येथील ‘श्री रामबाग गणेशोत्सव मंडळा’च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या उपक्रमाचा भाग म्हणून ‘महिलांची सद्यःस्थिती आणि स्वसंरक्षणाची आवश्यकता’ या अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांचे व्याख्यान मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देव, देश आणि धर्म या मार्गांनी मार्गक्रमण करत धर्महित आणि राष्ट्रहित साधण्याचा, तसेच स्वरक्षण करण्याचा संकल्प अन् हिंदु राष्ट्रासाठी शपथ घेतली. कु. रागेश्री देशपांडे यांनी युवती आणि महिला यांना सध्याच्या असुरक्षिततेची जाणीव करून देतांना यातून बाहेर पडण्यासाठी धर्मशिक्षण, धर्मपालन आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण यांविषयी माहिती दिली.
या वेळी ह.भ.प. योगेश महाराज यांनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांविषयी तरुण पिढी अन् त्यांचे आई-वडील यांना धर्माची व्याख्या समजावून सांगितली. मंडळाच्या सदस्यांनी अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबवून अचूक नियोजन केल्याविषयी सेलू येथील ‘श्री राम जन्मोत्सव समिती’च्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन तथा आभार मानण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मांडण्यात आलेल्या या ज्वलंत विषयाचा लाभ उपस्थित ८५० महिलांनी घेतला.
क्षणचित्रे
१. व्याख्यानानंतर अनेक महिलांनी सांगितले, ‘‘हा विषय पुष्कळ महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असल्याने सर्व महिलांना समजणे महत्त्वाचे आहे.’’
२. अनेक महिलांनी व्याख्यानात केलेल्या आवाहनानुसार नावनोंदणी कक्षावर येऊन ‘लव्ह जिहाद’ ग्रंथाची मागणी दिली, तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकणे आणि धर्मशिक्षण घेण्ो यांसाठीची सिद्धता दर्शवली.
३. ‘राम जन्मोत्सव समिती’च्या कार्यकर्त्यांनी महिलांच्या सुरक्षेविषयी संवेदनशीलता दाखवत व्याख्यान होण्यासाठी पुढाकार घेतला.
४. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मशिक्षण फलक’ आणि ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ हे ग्रंथ हिंदु राष्ट्राच्या कार्यात पुढाकार घेणार्या उपस्थित महिला आणि युवक यांना भेट म्हणून देण्यात आले.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात