Menu Close

आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी चंदगड (कोल्हापूर) येथे झालेल्या आंदोलनात १०० धर्मप्रेमी उपस्थित !

चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मनोगत व्यक्त करतांना श्री. आदित्य शास्त्री

चंदगड (जिल्हा कोल्हापूर), ३० सप्टेंबर (वार्ता.) – तेलंगाणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ३० सप्टेंबरला झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनासाठी १०० धर्मप्रेमींची उपस्थिती होती. आंदोलनात सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद धनवडे यांनी केले, तर श्री. आदित्य शास्त्री यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दयानंद पाटील आणि श्री. भैरवनाथ पाटील उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसीलदार विनोद रणावरे यांना निवेदन देण्यात आले.

विशेष

१. चंदगडसारख्या दुर्गम भागात झालेले पहिलेच आंदोलन होते आणि त्यासाठी १३ गावांमधून धर्मप्रेमी आले होते. आंदोलन यशस्वी होण्यासाठी श्रीराम सेनेचे श्री. महंदेश देसाई, श्री. तुकाराम मरगाळे, धर्मप्रेमी सर्वश्री शाहू दळवी, सचिन पाटील, विकास चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

२. आंदोलनस्थळी धर्मप्रेमींनी दिलेल्या जोरदार घोषणांनी आंदोलन लक्षवेधी झाले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *