उज्जैन – सिंहस्थात भाविक ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी साधूसंतांकडे येतात. अशा वेळी लोकांना कथा, प्रवचन, कीर्तन, संमेलन आदींच्या माध्यमातून साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अनेक संत, महंत, आखाडे, कथाकार आदींनी मोठे मांडव घातले आहेत. यात उत्तरप्रदेश येथील एका प्रसिद्ध कथावाचकाने आपल्या भल्या मोठ्या मांडवात विमल पान मसाला, शिमला पान मसाला, बम्बईया माऊथ फ्रेश यांसारखी गुटख्याची विज्ञापने, तसेच दबंग दुनिया, हॉटेल व्हिन-वे यांच्यासह अनेक विज्ञापने देणारी होर्डिंग्ज लावण्यात आली होती. कथेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर खाण्या-पिण्याची व्यावसायिक दुकानेही थाटली होती. येथे कथा चालते का व्यवसाय, असा प्रश्न येणार्या लोकांना पडला होता. येथे आलेल्या पहिल्या आणि दुसर्या मुसळधार पावसात हा मांडव संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला.