Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली येथे श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !

ध्वजाचे औक्षण करतांना सौ. संपदा पाटणकर, धारकरी श्री. हणमंतराव पवार, तसेच अन्य

सांगली, २ ऑक्टोबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिदिन काढण्यात येणार्‍या श्री दुर्गामाता दौडीचे २ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीफळ वाढवून, ध्वजाला हार अर्पण करून, तसेच ध्वजाचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी श्री. परशुराम (बापू ) गायकवाड, सौ. संपदा पाटणकर, सौ. पूनम ढमाले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. हणमंतराव पवार, श्री. हरिदास कालीदास यांसह अन्य उपस्थित होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *