कोल्हापूर : मणिधारी भवन, इचलकंजी येथे २६ एप्रिल या दिवशी सायं. ८ ते १० या वेळेत श्री. जैन श्वे. मणिधारी जिनचंद्र सुरि दादावाडी संघ, इचलकरंजी यांच्या वतीने एका सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी श्री. महावीर गोळेच्छा (इन्स्पायर फेलो भारत सरकार, १६ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित) आणि सोलापूर येथील रणरागिणीच्या जिल्हा संघटक सौ. राजश्री तिवारी हे दोघे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला २२० उपस्थिती लाभली.
महावीर गोळेच्छा यांनी जीवनातील अडचणींवर मात कशी करायची, राग कसा घालवायचा, सध्याची कौटुंबिक स्थिती याविषयी मार्गदर्शन केले, तर सौ. राजश्री तिवारी यांनी सध्याच्या मुलींची स्थिती, लव्ह जिहादचे स्वरूप, लव्ह जिहादपासून रोखण्यासाठी मुलींना धर्मशिक्षण देणे, स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे आणि सर्व हिंदूंनी संघटित होणे, याविषयी विवेचन केले. कार्यक्रमानंतर भारतीय जैन संघटनेचे शहर अध्यक्ष संघवी ऋषभलाल छाजेड यांनी भारतीय जैन संघठनाला समितीशी जोडून घ्या, असे सांगितले.
उपस्थित मान्यवर : अखिल भारतीय युवा परिषदेचे सांस्कृतिक मंत्री श्री. सुरेश ललवानी, वरिष्ठ समाजसेवक बाबुलालजी लुनकुंड, नाकोडा जैन युवक मंडळाचे अध्यक्ष दीपचंदजी तळेसरा, तेरापंथ सभेचे जेठराजजी छाजेड अध्यक्ष, श्री. जैन श्वे. मणिधारी जिनचंद्र सुरि दादावाडी संघाचे दिनेश माळू कोशाध्यक्ष आणि आयोजक श्री. रमेश लुनकुंड उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात