नवरात्रोत्सवात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत रणरागिणी शाखेच्या वतीने १० ठिकाणी व्याख्याने !
मुंबई – भारतामध्ये दिवसागणिक लव्ह जिहाद, महिलांवरील अत्याचार, बलात्कार, महिलांची छेड यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लव्ह जिहादमध्ये फसून लक्षावधी हिंदु युवतींचे युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या संकटांचा बिमोड करण्यासाठी हिंदु युवतींना धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. नवरात्रोत्सव हा महिषासुराचा वध करणार्या शक्तीरूपिणी दुर्गादेवीच्या उपासनेचा काळ आहे. प्रत्येक स्त्रीने या शक्तीतत्त्वाची आराधना करून, स्वतःतील शौर्य जागृत करणे आवश्यक आहे. आजही समाजामध्ये महिषासुराप्रमाणे अनेक आसुरी प्रवृत्ती कार्यरत आहेत. प्रत्येक स्त्रीने महिषासुरमर्दिनीप्रमाणे त्याचा प्रतिकार करण्यासाठी धर्माचरणाने स्वतःतील देवीतत्व जागृत करणे आवश्यक आहे. आज देव, देश आणि धर्म रक्षणासाठी अन् हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येक हिंदु स्त्रीने झाशीची राणी आणि जिजामाता यांच्याप्रमाणे रणरागिणी म्हणून सिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी नवरात्रोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानांमध्ये केले. १ सहस्र २०० हून धर्मप्रेमींनी या व्याख्यानांचा लाभ घेतला.
धुळे, तसेच नंदुरबार जिल्ह्यांतील तळोदा येथे एकूण १० नवरात्रोत्सव मंडळांमध्ये या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे महत्त्व, हिंदु धर्मात स्त्रीचे स्थान, सध्याची महिलांची स्थिती, पाश्चिमात्य संस्कृतीचे दुष्परिणाम, लव्ह जिहाद, धर्माचरण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
क्षणचित्रे
१. व्याख्यानानंतर अनेक महिलांनी सांगितले, ‘‘हा विषय पुष्कळ महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असल्याने सर्व महिलांना समजणे महत्त्वाचे होते.’’
२. व्याख्यानानंतर अनेक महिलांनी आपापल्या भागांमध्ये धर्मशिक्षणवर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.
३. या वेळी लव्ह जिहादविषयी जागृती करणारी पत्रकही वाटण्यात आले.
४. या व्याख्यानानंतर हिंदु राष्ट्राची सामूहिक शपथ सर्व ठिकाणी घेण्यात आली.
५. अनेक मंडळांमध्ये गरबा कार्यक्रम चालू होता. तो थांबवून सर्व महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी संपूर्ण विषय ऐकून घेतला.
६. हे व्याख्यान मंडळांमध्ये व्हावे, यासाठी त्या त्या भागातील हिंदु धर्मप्रेमी युवकांनी पुढाकार घेऊन आयोजन केले.
७. नवदुर्गा महिला मंडळ, मीरा कॉलनी, तळोदा येथील महिलांना कुंकू लावण्याचे शास्त्र समजल्यावर सर्वांनी नियमितपणे कुंकू लावण्याचा निर्धार केला.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात