हिंदु जनजागृती समितीचे ३ ते ५ ऑक्टोबर ‘हर घर भगवा’ अभियान !
गेले काही दिवस सामाजिक माध्यमांद्वारे या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अनेकांनी ‘व्हॉट्सॲप’वर वैयक्तिक, तसेच गटांचा ‘डीपी’ हा ‘हर घर भगवा’ अभियानाचा ठेवला आहे. |
कोल्हापूर, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीतील देशव्यापी ‘हर घर भगवा’ अभियानास ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावांमध्ये आणि गल्ल्यांमध्ये भगवा ध्वज डौलाने फडकला. अनेक सामान्य हिंदूंनीही या अभियानात सहभागी होत स्वत:च्या घरांवर अभिमानाने भगवा ध्वज फडकवला.
१. उंचगाव येथील लोणार वसाहत येथील १०० घरांवर भगवा ध्वज लावण्यात आला होता. या उपक्रमात सर्वश्री अनिल गौंड, नितीन काळे, संतोष चोरगे, महेश काळे यांसह अन्य सहकारी यांनी पुढाकार घेतला.
२. शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव या अभियानात सहभागी आहेत.
सांगली जिल्हा
१. कुमठे (तासगाव) येथील श्री. संतोष पाटील आणि श्री. भगवान गुरव यांसह धर्मप्रेमींनी भगवा ध्वज लावला आहे.
२. तुजारपूर (जिल्हा सांगली) येथील अनेक धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या घरांवर झेंडे लावले आहेत.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात