Menu Close

गुजरातमध्ये ख्रिस्त्यांनी देवीचे प्राचीन मंदिर पाडून बनवले ‘मरियम माता टेम्पल’ !

नवरात्रीत हिंदु पूजेसाठी गेले असता ख्रिस्त्यांनी दगड आणि लाठ्या आणून हिंदूंना केला विरोध !

  • हिंदूंनो, आता धर्मांध मुसलमानच नव्हे, तर ख्रिस्तीही तुमची मंदिरे पाडून चर्च उभी करत आहेत, हे जाणा ! ही परिस्थिती पालटायची असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
  • वर्ष २०१५ मध्ये देहलीत, तसेच इतरत्र विविध चर्चवर झालेल्या कथित आक्रमणांवरून हिंदूंना वेठीस धरणारी धर्मनिरपेक्षतावादी टोळी आता कोणत्या बिळात जाऊन लपली आहे ? -संपादक 
मंदिर पाडून उभारलेले चर्च

कर्णावती (गुजरात) – राज्यातील तापी जिल्ह्यात असलेल्या सोनगड तालुक्यातील बंदरपाडा या गावी स्थानिक ख्रिस्त्यांनी तेथील हिंदूंचे प्राचीन मंदिर पाडून तेथे चर्च उभारले आहे. चर्चला ‘मरियम मातेचे मंदिर’ असे नाव देण्यात आले आहे. २ ऑक्टोबरला हिंदू त्या ठिकाणी देवीची पूजा करण्यासाठी गेले असता ख्रिस्त्यांनी हातात दगड आणि लाठ्या घेऊन हिंदूंना तेथे पूजा करण्यापासून मज्जाव केला. (हिंदूंना त्यांच्याच देशात पूजा-अर्चा करू न द्यायला हा भारत आहे कि इटली, इंग्लंड अथवा अमेरिका यांच्यासारखा ख्रिस्ती देश ? – संपादक)

१. येथे ‘गिधमाडी आया डूंगर माता’ नावाचे देवीचे प्राचीन मंदिर होते. तेथे स्थानिक हिंदू पूजेसाठी प्रतिदिन जात असत. हे मंदिर येथील एका डोंगरावर होते.

२. कालपरत्वे या क्षेत्रात ख्रिस्त्यांची लोकसंख्या वाढत गेल्याने मंदिरात जाण्याचे हिंदूंचे प्रमाण न्यून होत गेले. याचा अपलाभ उठवत ख्रिस्त्यांनी मंदिर पाडून तेथे चर्च उभारले.

३. नवरात्रीसाठी जेव्हा हिंदू प्राचीन मंदिरात पोचले, तेव्हा ख्रिस्त्यांनी तेथे येऊन हिंदूंना विरोध केला.

४. ‘ऑपइंडिया’ या हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंकेतस्थळाशी बोलतांना स्थानिक हिंदु नेते दिनेशभाई गामित म्हणाले की, मंदिरात पूजा करण्यासाठी जात असतांना ख्रिस्त्यांनी आम्हा हिंदूंना तेथे जाण्यापासून रोखले, तसेच पुजार्‍यावर हात उगारला. तसेच देवीसाठी बनवलेला नैवेद्य खराब करण्याचाही प्रयत्न केला. पोलीस वेळेत घटनास्थळी उपस्थित झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

५. स्थानिक हिंदूंनी दिलेल्या माहितीनुसार हिंदू या मंदिरात शेकडो वर्षांपासून पूजा करत आले आहेत; परंतु गेल्या काही वर्षांपासून येथे ख्रिस्त्यांनी मोठ्या प्रमाणात धर्मांतर केल्याने बहुतांश हिंदू ख्रिस्ती झाले. येथे ९८ टक्के लोक ख्रिस्ती झाले असून हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. त्यामुळे येथील हिंदू या विरोधात आवाज उठवू शकत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील सरपंच आणि स्थानिक राजकारण यांच्यावर ख्रिस्त्यांचा प्रभाव राहिला आहे.

हिंदु मंदिराच्या जीर्णाेद्धारासाठी मिळालेल्या निधीतून मंदिर पाडून उभारण्यात आले चर्च !

ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद ! हिंदूंमधील धर्मशिक्षण आणि संघटन यांच्या अभावामुळेच ख्रिस्ती हे करू धजावले, हे लक्षात घ्या !

वर्ष २०१९ मध्ये एक प्रस्ताव संमत करण्यात आला होता. या अंतर्गत ‘गिधमाडी आया डूंगर माता मंदिरा’चा जीर्णाेद्धार करण्याचे ठरवण्यात आले होते. अनेक वर्षांपासून हिंदूंनी या मागणीसाठी आंदोलनही केले होते. या प्रस्तावामध्ये चर्च अथवा अन्य कोणत्याही प्रार्थनास्थळाचा उल्लेख नव्हता. प्रस्ताव संमत झाल्यावर त्यासाठी अनुदान प्राप्त करण्यात आले; परंतु याचा उपयोग देवीचे मंदिर पाडून चर्च उभारण्यासाठी करण्यात आला. मंदिराचे अनेक अवशेषही येथे मिळाले आहेत, असे स्थानिक हिंदूंनी सांगितले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *