मुसलमान शिक्षकाने आणला होता दबाव !
मुसलमान कोणत्याही पदावर पोचले, तरी ते त्यांच्या धर्मासाठी काहीही करण्यास सिद्ध असतात, तर हिंदूंना त्यांचा धर्मच नीट ठाऊक नसतो ! – संपादक
खेडा (गुजरात) – येथील हथाज गावामध्ये एका शाळेत नवरात्रीनिमित्तच्या कार्यक्रमात गरबाचे गाणे वाजवणे बंद करून मोहरमच्या संदर्भातील गाणे वाजवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुसलमान शिक्षकाने यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला होता. या घटनेमुळे येथे तणाव निर्माण झाला. या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात हिंदु विद्यार्थ्यांनी मुसलमान घालतात त्या प्रकारचे टी-शर्ट घालून (काळ्या रंगाचे) मोहरमची मिरवणूक काढून ते छाती पिटत असल्याचे दिसत आहे. गावकर्यांनी याविषयी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
Row after students were made to perform Tajia instead of #Garba in #Navratri celebrations #Nadiad #Gujarat #TV9News pic.twitter.com/wLesyP0hVR
— Tv9 Gujarati (@tv9gujarati) October 2, 2022
स्रोत: दैनिक सनातन प्रभात