Menu Close

हिंदु तरुणीला हिंदु असल्याचे सांगून तिच्याशी विवाह करून बलपूर्वक धर्मांतर !

  • बिलासपूर (छत्तीसगड) येथे ख्रिस्ती तरुणाचे ‘लव्ह क्रूसेड’ !

  • धर्मांतरानंतरही चर्चमध्ये जाण्यासाठी आणि हुंड्यासाठी छळ !

  • पोलिसांत तक्रार करूनही कारवाई नाही !

  • छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदु तरुणींना न्याय मिळण्याची शक्यता नाहीच, हे लक्षात घ्या !
    मुसलमानांपाठोपाठ आता ख्रिस्तीही हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत आहेत, हे लक्षात घ्या ! हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही ! -संपादक 

बिलासपूर (छत्तीसगड) – येथे आभा मिरे या तरुणीला आशिष पात्रे या ख्रिस्ती तरुणाने तो हिंदु असल्याचे सांगत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर मंदिरात जाऊन तिच्याशी विवाह केल्यानंतर तिचे धर्मांतर केले आणि चर्चमध्ये जाऊन पुन्हा विवाह केला. त्यानंतर आशिष तिचा छळ करू लागल्याने ती तिच्या १० मासांच्या मुलीला घेऊन माहेरी परतली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी हुंड्याची घटना सांगून तक्रार नोंदवून घेतली; मात्र धर्मांतराचा विषय टाळला. तरीही पोलिसांनी आशिष आणि अन्य जण यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही.

आभा हिने सांगितले की, ‘फेसबुकद्वारे आशिष याच्याशी माझी ओळख झाली होती. त्याने तो हिंदु असल्याचे सांगितले होते. १३ फेब्रुवारी २०१९ या दिवशी रायपूरच्या  बैजनाथपारामधील आर्य समाज मंदिरात आमचा हिंदु परंपरेनुसार विवाह झाला. नंतर मी सासरी गेले. तेथे कळले की, ते सर्वच जण ख्रिस्ती झाले आहेत. त्यांनी मलाही ख्रिस्ती होण्यासाठी छळण्यास चालू केले आहे.

(क्रूसेड म्हणजे ख्रिस्त्यांनी पुकारलेले धर्मयुद्ध !)

माझे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर चर्चमध्ये जाऊन पुन्हा विवाह करण्यात आला. त्यानंतरही माझा छळ बंद झाला नाही. चर्चमध्ये जाण्यासाठी मला मारले जात होते. शिवीगाळ केली जात होती. आई-वडिलांकडून ८ लाख रुपये आणण्यास सांगितले जात होते. मी हिंदु असल्याने माझ्यावर हा अत्याचार करण्यात येत होता. मी माझी कथा जगाला यासाठी सांगू इच्छिते की, हिंदु तरुणींनी सतर्क रहावे. त्यांची शिकार करण्यासाठी कशा प्रकारची षड्यंत्रे रचली जात आहेत, हे त्यांना कळले पाहिजे. मी सुशिक्षित असतांनाही यात फसले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *