Menu Close

उज्जैन सिंहस्थ : निसर्गाचा कोप असतांनाही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनास संत अन् जिज्ञासू यांच्या भेटी चालूच !

swami_shraddhanand

उज्जैन : उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री ५ मे २०१६ या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध संप्रदायांचे मांडव कोसळले. त्यात सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण आणि ग्रंथ प्रदर्शनाला काही प्रमाणात झळ बसली असली, तरी दुसर्‍या दिवशी प्रदर्शन न थांबता भगवान श्रीकृष्ण, महर्षि आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे प्रदर्शनाला संत, भाविक आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या भेटी सकाळपासून चालू झाल्या. जणू काही झालेच नसून नित्यनियमाप्रमाणे पूर्ववत् प्रदर्शन चालू असल्याची अनुभूती ईश्‍वराच्या कृपेने सनातनचे संत आणि साधक यांना आली. त्या तुलनेत अन्य ठिकाणी तेथील दैनंदिन व्यवहार काही दिवसांसाठी ठप्प रहाणार आहेत.

संत, मान्यवर आणि जिज्ञासू यांनी प्रदर्शनाला भेट देणे !

प्रदर्शनाचे छत फाटून खाली आलेले असतांना आणि प्रदर्शन शेतभूमीवर असल्याने तीव्र पावसामुळे सर्वत्र चिखल झालेला असतांनाही सकाळी १० च्या सुमारास गोड्डा, झारखंड येथील अंग गौरव स्वामी श्रद्धानंदजी महाराज त्यांच्या अनुयायांसह प्रदर्शन पहाण्यास आले होते. सर्वत्र चिखल असतांनाही महाराजांनी धर्मशिक्षणविषयक सर्व फलक लक्षपूर्वक पाहिले आणि माहिती समजून घेतली.

राजस्थानचे अतिरिक्त कामगार आयुक्त धनराज शर्मा आणि उज्जैन येथील डॉ. देवकरण शर्मा महाराज यांची प्रदर्शनाला भेट !

राजस्थान राज्यातील अतिरिक्त कामगार आयुक्त श्री. धनराज शर्मा आणि उज्जैन येथील ऋषि गुरुकुलचे परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा महाराज यांनी प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांनी अनेक ग्रंथ खरेदी केले. संत आणि मान्यवर यांच्या पाठोपाठ सर्वसामान्य लोकांनी प्रदर्शनाला भेट देण्यास प्रारंभ केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *