Menu Close

अलीगड मुस्लिम विद्यापिठात मुसलमान विद्यार्थ्यांची झुंडशाही !

  • हिंदु विद्यार्थ्यावर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यासाठी बळजोरी

  • हिंदु विद्यार्थ्याच्या बहिणीला हिजाब घालण्याची धमकी

  • अलीगड मुस्लिम विद्यापिठातील धर्मांध कारवाया नेहमीच चर्चेत असतात ! तेथे विद्यार्थी शिकण्यासाठी नव्हे, तर धार्मिक कट्टरता पसरवण्यासाठी येतात का, असा प्रश्न पडतो !
  • शिक्षणबाह्य हिंसाचारी आणि गुंडगिरी करणारे विद्यार्थी असलेल्या अशा विद्यापिठांची सर्व अनुदाने बंद करण्यात यावीत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक 
अलीगड मुस्लिम विद्यापीठ

नवी देहली – उत्तरप्रदेशातील अलीगड मुस्लिम विद्यापिठातील मुसलमान विद्यार्थ्यांनी एका हिंदु विद्यार्थ्याला बलपूर्वक ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यास  भाग पाडले. एवढेच नाही, तर विरोध केल्याने विद्यार्थ्याला अमानुष मारहाणही करण्यात आली. अलीगड मुस्लिम विद्यापिठात एका पाठोपाठ एक वाद चालूच असतात. आता हे विद्यापीठ पुन्हा एकदा देशविरोधी कृत्यांमुळे वादात सापडले आहे.

१. पीडित हिंदु विद्यार्थ्याचे नाव साहिल कुमार आहे. तो ‘एम्.टेक्.’च्या प्रथम वर्षात शिकत आहे. त्याने आरोप केला आहे की, रेहवर दानिश नावाचा मुसलमान विद्यार्थी त्याला वेळोवेळी धमकावतो. ‘विद्यापिठाच्या आवारात रहायचे असेल, तर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा द्याव्याच लागतील’, अशी धमकी देत असे.

२. दानिश आणि त्याचा मुसलमान साथीदार यांनी त्याला ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यास भाग पाडले. त्याच्या मनगटावरील दोरा काढण्यास सांगितले.

३. ‘त्याच्या बहिणीलाही हिजाब घालायला लावेन’, अशी धमकी या मुसलमान विद्यार्थ्यांनी दिली आहे.

४. काही दिवसांपूर्वी दानिश याने साहिलवर बंदुकीने वार केले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *