Menu Close

विदिशा (मध्यप्रदेश) येथील सरकारी शाळेत मजार उभारल्यावरून मुसलमान मुख्याध्यापिका निलंबित

  •  शाळेत नियमित राष्ट्रगीत गायले जात नाही !

  •  मुसलमान विद्यार्थ्यांना शुक्रवारी सुटी !

  •  मुसलमानांकडून शाळेत नमाजपठण !

  • इतिहासाचे कथित भगवेकरण झाल्याचा आरोप करत हिंदूंना वेठीस धरणारी धर्मनिरपेक्षतावादी टोळी आता कोणत्या बिळात जाऊन लपली आहे ?
  • हिंदूंच्या देशात सरकारी शाळेत सरस्वतीदेवीची पूजा नव्हे, तर नमाजपठण केले जाते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक ! -संपादक
शाळेत उभारण्यात आलेली मजार

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील विदिशा जिल्ह्यातील कुरवाईत असलेल्या ‘सीएम् राईज स्कूल’मध्ये दुरुस्तीसाठी मिळालेल्या पैशांचा वापर मजार बनवण्यासाठी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी मध्यप्रदेश शासनाने शाळेच्या मुसलमान मुख्याध्यापिका शायना फिरदौस यांना निलंबित करण्यात आले आहे. फिरदौस यांचे पती शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनीच ही मजार उभारली आहे. शाळेच्या निवृत्त शिक्षकांनी शाळेमध्ये श्री सरस्वतीदेवीचे मंदिर उभारण्याची मागणी केली होती. फिरदौस यांनी ती फेटाळली होती.

फिरदौस यांनी शाळेमध्ये फेब्रुवारी २०२२ मध्ये चौथरा बांधून घेतला आणि पुढे त्याला मजारचे रूप दिले. शाळेत मुसलमान लोक शुक्रवारी नमाजपठण करण्यासाठीही येऊ लागले होते. मुसलमान विद्यार्थ्यांना शुक्रवारी सुटीही देण्यात येत असे. शाळेतील शिक्षकांनी या प्रकरणी जिल्हा शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर प्रकरणाचे गोपनीय अन्वेषण करण्यात आले. त्यानंतर सरकारी शाळेचे रूपांतर इस्लामी धार्मिक वास्तूमध्ये करण्याचे कारस्थान उघडकीस आले.

राज्यशासनाने काही कालावधीपूर्वीच या शाळेला ‘सीएम् राइज स्कूल’च्या रूपात तिचा विकास करण्यासाठी निवडले होते; परंतु त्यानंतर मिळालेल्या अनुदानाचा गैरवापर होत असल्याचे समोर आले. जिल्हा शिक्षण अधिकारी अतुल मुद्गल यांनी यानंतर फिरदौस यांचे स्थानांतर करण्याचा आदेश दिला. मुद्गल यांचे म्हणणे आहे की, त्यांनी ३१ ऑगस्टला विद्यालय परिसरात असलेली मजार हटवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहिले होते. अजूनपर्यंत मजार हटवण्यात आलेली नाही.

अनधिकृत चौथरा तोडण्यात येईल ! – उपविभागीय दंडाधिकारी

कुरवाईच्या उपविभागीय दंडाधिकारी अंजली शाह यांनी या प्रकरणी म्हटले की, विद्यालय परिसरात उभारलेला अनधिकृत चौथरा तोडण्यात येईल. शाळेमध्ये राष्ट्रगीत केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन या दिवशीच गायले जात आहे. प्रतिदिन केवळ ‘ऐ मालिक तेरे बंदे हम…’ या चित्रपटातील गीतावर प्रार्थना केली जात होती.

शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांचा कानाडोळा ! – राष्ट्रीय बाल संरक्षण अधिकार आयोगाचा आरोप

संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई होणे अपेक्षित !

राष्ट्रीय बाल संरक्षण अधिकार आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी या शाळेला नुकतीच भेट दिली. त्यांनी या वेळी आरोप केला की, विद्यालय परिसरात बर्‍याच कालावधीपासून धर्मविशेष (मुसलमानांवर आधारित) गोष्टी संचालित केल्या जात आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनीही याकडे कानाडोळा केला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *