इंदूर (आंध्रप्रदेश) : हिंदु जनजागृती समिती आणि इंडियन मेडिकल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० एप्रिल या दिवशी येथील माणिकभंडार गावामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा २०० ग्रामस्थांनी लाभ घेतला. या उपक्रमासाठी आयएम्एचे अध्यक्ष डॉ. सुरेश, युरोलॉजिस्ट डॉ. राघवेंद्र, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल सिंह, स्त्रीरोग तज्ञ डॉ. पद्मजा आदींसह २० प्रसिद्ध डॉक्टरांनी योगदान दिले.
या शिबिराचा प्रारंभ प्रभू श्रीरामाला प्रार्थना करून आणि नारळ वाढवून करण्यात आला. या शिबिरामध्ये शुगर, रक्तदाब आणि हिमोग्लोबिन यांची तपासणी करण्यात आली, तसेच या संदर्भातील उचित औषधांचेही वितरण करण्यात आले.
क्षणचित्रे
१. मंदिराच्या आवारात धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
२. गावचे उपसरपंच यांनी शिबिरात कृतीशील सहभाग घेतला.
३. शिबिरासाठी गावातील १० युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
४. यापुढे प्रति १५ दिवसानंतर असे शिबीर आयोजित करण्याचा मनोदय उपस्थित डॉक्टरांनी व्यक्त केला.
५. गावातील युवकांनी १५ दिवसांतून एकदा धर्मशिक्षण वर्ग घेण्याची समितीकडे मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात