हिंदु राष्ट्र संकल्प अभियान
पुणे – दसर्याच्या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून शस्त्रपूजन करणे, ही हिंदु धर्माची परंपरा आहे. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती निमित्ताने चालू असलेल्या हिंदु राष्ट्र संकल्प अभियानांर्तगत समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांनी विविध ठिकाणी सामूहिक शस्त्रपूजन केले. महाराष्ट्रातील अमरावती, संभाजीनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकमधील बेंगळुरू येथे एकूण २५ ठिकाणी सामूहिक शस्त्रपूजन करण्यात आले. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना, प्रतिज्ञा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा विजयादशमी निमित्तचा संदेश सर्वांना वाचून दाखवण्यात आला. या उपक्रमात १ सहस्र २०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
क्षणचित्रे
१. बेंगळुरू येथे माता श्री ललितादेवीच्या मंदिरामध्ये पुजार्यांनी शस्त्रपूजन केले. ‘हिंदू राष्ट्राचे कार्य निर्विघ्नपणे होऊ दे, यासाठी देवी तुम्हाला शक्ती देईल’, असा आशीर्वाद पुजार्यांनी देऊन कुंकू आणि फुले प्रसाद स्वरूपात दिली.
२. कोल्हापूर येथील मंगेश मंदिरात पूजन झाल्यावर मंदिरात येणारे भाविक शस्त्रपूजनाच्या ठिकाणी येऊन त्याचीही पूजा करत होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात