Menu Close

आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्याकडून हिंदु धर्मद्रोही विज्ञापन प्रसारित !

  • अनेकांकडून विज्ञापनावर बहिष्कार !

  • दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याकडून टीका !

  • अन्य धर्मियांच्या प्रथा-परंपरांमध्ये अशी छेडछाड करण्याचे धाडस विज्ञापन आस्थापन, बँक आणि कलाकार यांनी दाखवले असते का ?
  • हिंदू संघटित नसल्यानेच कुणीही उठतो आणि हिंदूंच्या परंपरांचे विडंबन करतो, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे !
  • आतापर्यंत हिंदु धर्म आणि परंपरा यांच्या विरोधात अभिनय करणारे हिंदुद्वेष्टे आमीर खान आणि हिंदु धर्मविरोधी भूमिका घेणार्‍या कियारा अडवाणी यांच्या चित्रपटावर सर्वच हिंदूंनी बहिष्कार घालावा ! -संपादक 

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचे एक हिंदु धर्मद्रोही विज्ञापन प्रसारित झाले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही या प्रकरणी आमीर खान यांच्यावर टीका केली आहे. अनेकांनी या विज्ञापनावर बहिष्कार टाकायला प्रारंभ केला आहे. या प्रकरणी विज्ञापन आस्थापन, बँक आणि कलाकार यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

असे आहे विज्ञापन !

हे विज्ञापन एका बँकेच्या प्रसिद्धीसाठी चित्रीत करण्यात आले आहे. यात आमीर आणि कियारा यांचा विवाह झाल्याचे दाखवले आहे. त्यात वधूच्या पाठवणीच्या ऐवजी वराची पाठवणी केली जाते.
वधूच्या घरी जाऊन वर माप ओलांडल्यासारखा घरात प्रवेश करतो. यातून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोपही या विज्ञापनावर करण्यात आला आहे.

हे विज्ञापन म्हणजे फालतूपणा आहे ! – विवेक अग्निहोत्री, दिग्दर्शक

विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटद्वारे टीका करतांना म्हटले, ‘‘धार्मिक आणि सामाजिक परंपरा पालटण्यासाठी बँका कधीपासून उत्तरदायी आहेत ? हे मला समजू शकले नाही. मला वाटते की, ‘एयू बँक इंडिया’ने बँकेची भ्रष्ट कार्यप्रणाली पालटून कामात सक्रियता आणायला हवी. असा फालतूपणा करतात आणि म्हणतात की, हिंदू ‘ट्रोल’ करत आहेत. मूर्ख !’’

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *