Menu Close

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करून संबंधित संस्थांची चौकशी करावी !

यवतमाळ येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वर्‍हाडे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते

यवतमाळ – सध्या भारतीय मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. ही मागणी केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी. उत्पादनेही हलाल नामांकित असावीत, अशी मागणी मुसलमान करत आहेत. त्यासाठी व्यापार्‍यांना सहस्रो रुपये भरावे लागत आहेत. मुसलमान समाजाच्या मागणीमुळे बहुसंख्यांक हिंदु समाज, मुसलमानेतर अन्य अल्पसंख्यांक समाज यांना हलाल प्रमाणित पदार्थ किंवा उत्पादने घ्यायला लावणे, हे धार्मिक अधिकारांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे धार्मिक भेदभाव करणार्‍या हलाल प्रमाणपत्रावर भारतात बंदी आणावी. ज्या खासगी आस्थापनांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची अनुमती देण्यात आली आहे, त्यांची अशी अनुमती त्वरित रहित करावी, या संस्थांची सीबीआयद्वारे चौकशी करून निधीचा वापर आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी झाला का ?, राष्ट्रीय सुरक्षेला काही धोका नाही ना ?, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधानांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

यवतमाळ येथील निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वर्‍हाडे यांना निवेदन देतांना श्रीराम जन्मोत्सव समितीचे श्री. मनोज औदार्य, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे श्री. विनोद अरेवार, जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अधिवक्ता अजय चमेडिया, भाजपचे जिल्हा सचिव श्री. सूरज गुप्ता, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सागर लुटे, योग वेदांत सेवा समितीचे श्री. यशवंत वैरागडे, श्री. विठ्ठल इचगमवार, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. मंगेश खांदेल यांसह संघटनांचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *