अमरावती येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनातील धर्मप्रेमींची मागणी
अमरावती – वक्फ कायद्यामध्ये काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले आहेत. मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा वरकरणी दिसतो; मात्र त्याच्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हेत, तर सरकारची संपत्तीही सहजपणे बळकावता येते. हा देशभरात कायद्याच्या दुरुपयोगाने चालू असलेला ‘लँड जिहाद’च आहे. हा धार्मिक भेदाभेद करणारा, राज्यघटनाविरोधी काळा कायदा त्वरित रहित करण्यात यावा, असे मत हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वय श्री. नीलेश टवलारे यांनी व्यक्त केले. आंदोलनाला अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.
‘भारत रक्षा मंच’चे महानगर प्रमुख श्री. विनय मोटवानी, राष्ट्रीय श्रीराम सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. संगम गुप्ता यांनीही या वेळी कायद्याला विरोध असल्याचे मत व्यक्त केले.
‘भारत रक्षा मंच’चे जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजेश मिश्रा, अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे प्रदेश अध्यक्ष श्री. राजेंद्रसिंह राजपूत, विश्व हिंदु परिषदेचे महानगर अध्यक्ष श्री. दिनेश सिंह आणि महानगर सहमंत्री श्री. मयूर जयस्वाल, भाजप किसान विकास आघाडीचे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस श्री. प्रदीप ठोसर, श्री कौंडण्यपूर पिठाचे विश्वस्त श्री. गिरीधर चव्हाण आदी आंदोलनाला उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. युवा धर्मप्रेमींनी आंदोलनात उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.
२. रस्त्यावरून ये-जा करणारे हिंदू विषय ऐकून स्वतःहून स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनीही घोषणांमध्ये सहभाग घेतला.
३. ‘हिंदु जनजागृती समितीकडूनच हा गंभीर विषय आम्हाला समजला’, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात