Menu Close

चोपडा (जिल्हा जळगाव) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी !

वक्फ बोर्डाचा ‘वक्फ कायदा’ रहित करा !

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

जळगाव – वर्ष १९२५ मध्ये ब्रिटीश सरकारने मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी ‘वक्फ कायदा’ अस्तित्वात आणला होता. वर्ष १९९५ आणि वर्ष २०१३ मध्ये काँग्रेस सरकारने या कायद्यात केवळ मुसलमानच नव्हे, तर हिंदु, शीख, बौद्ध, ख्रिस्ती अशा सर्वधर्मियांची कोणतीही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचे अत्यंत भयानक अधिकार बोर्डाला दिले. कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ केला जात आहे. वर्तमानात वक्फ बोर्डाकडे ८ लाख एकरहून अधिक भूमीची मालकी आहे. हे असेच चालू राहिले, तर काही वर्षांत भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाची झालेली असेल आणि पुन्हा एकदा एक मोठा भूभाग गिळंकृत करून भारताच्या पोटात नवा पाकिस्तान निर्माण होईल. यासाठी देशविरोधी वक्फ कायदा त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली.

आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनिल वानखडे, भाजपचे तालुका सरचिटणीस नरेंद्र पाटील, तालुका अध्यक्ष पंकज पाटील, राष्ट्रीय सुरक्षा मंचचे गोपाल श्रीराम पाटील, बजरंग दलाचे प्रेम घोगरे, शिवप्रतिष्ठानचे जिग्नेश कंखरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजू स्वामी, देवगिरी कल्याण आश्रमचे जितेंद्र महाजन, सामाजिक कार्यकर्ते दिलीप नेवे, हिंदु जागरण मंचचे सागर नेवे यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *