Menu Close

हिंदूंच्याच दुकानातून दिवाळीचे साहित्य खरेदी करण्याचे आवाहन करणार्‍या तमिळनाडूतील हिंदु कार्यकर्त्याला अटक

  • हिंदूंना हिंदूंच्या दुकानातून साहित्य खरेदी करण्याचे आवाहन करणे या देशात गुन्हा झाला आहे, हे हिंदू कधी लक्षात घेणार ? ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
  • तमिळनाडूमध्ये मुसलमानप्रेमी असणार्‍या तथाकथित नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) या पक्षाचे सरकार असतांना याहून वेगळे काय घडणार ? -संपादक 
हिंदु मुन्नानी या संघटनेचे कार्यकर्ते शक्ती

चेन्नई (तमिळनाडू) – येथे हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर) या संघटनेचे कार्यकर्ते शक्ती (वय ३२ वर्षे) यांना समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. शक्ती वेंगामेडू ज्योतिदार स्ट्रीट येथे रहाणारे असून या संघटनेचे ते करूर जिल्हा समन्वयक आहेत. त्यांनी हिंदूंना दिवाळीच्या वेळी हिंदूंकडून चालवल्या जाणार्‍या दुकानांमधूनच साहित्य खरेदी करण्याचे आवाहन करणारी पत्रके वितरित केली होती. हिंदूंनी दुकानातून वस्तू खरेदी करण्यापूर्वी प्रथम ‘दुकानात हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत का ?’, हे पहाण्याचे आवाहन या पत्रकातून करण्यात आले होते. यावरून त्यांच्यावर भा.दं.वि. कलम १५३ अ (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सद्भाव राखण्यासाठी प्रतिकूल कृत्ये करणे) आणि ५०५ (सार्वजनिक क्षोभ निर्माण करणारी विधाने) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *