Menu Close

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा – हलाल सक्तीविरोधी कृती समितीचे निवेदन

गडहिंग्लज आणि पेठवडगाव, तसेच निपाणी (कर्नाटक) येथे हलाल सक्तीविरोधी कृती समितीचे निवेदन

कोल्हापूर – धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांचे अन्वेषण करावे, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन हलाल सक्तीविरोधी कृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात पेठवडगाव आणि गडहिंग्लज येथे, तर कर्नाटक राज्यात निपाणी येथे देण्यात आले.

१. पेठवडगाव येथे नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी स्वप्नील रवींद्र रानगे यांनी स्वीकारले. याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पेठवडगावचे श्री. धनंजय गोंदकर आणि श्री. सुहास झगडे, भाजपचे सरचिटणीस श्री. राजेंद्र जाधव, भाजप युवामोर्चा सरचिटणीस श्री. राजेंद्र बुरूड, भाजप युवा मोर्चा शहरप्रमुख श्री. विकास कांबळे, भाजप शहरउपाध्यक्ष श्री. प्रसाद चव्हाण, ‘व्यापारी असोसिएशन’चे श्री. राजेंद्र बुकशेट, व्यापारी श्री. रवींद्र माळी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष श्री. उदय खडके, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, सर्वश्री विशाल पाटील, मोहन पाटील, प्रमोद जगताप, अनिकेत पाटील, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

२. गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी कार्यालयात तहसीलदार जीवन क्षीरसागर यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी भाजप शहराध्यक्ष श्री. राजेंद्र तारळे, सर्वश्री शिवानंद जरळी, प्रदीप भेंजी, प्रीतम कापसे, मनोज पवार, सुनील पाटील, अभिनंदन पाटील, वसंत नाईक, संदीप लिगाडे, अमोल कोरवी, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी, सौ. विजया वेसणेकर यांसह अन्य उपस्थित होते.

३. निपाणी (कर्नाटक) येथे उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी श्रीराम सेनातालुकाप्रमुख श्री. राजू कोपार्डे, विश्व हिंदु परिषदेचे शहर उपाध्यक्ष श्री. सचिन जाधव, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अभिनंदन भोसले, आतिश चव्हाण, अमोल चेंडके, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, राजेंद्र गुरव, श्री. विठ्ठल कोगले, योगेश चौगुले, जुगल वैष्णव उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *