हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘बॉलीवूडचा जिहादी चेहरा’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
पुणे – महाराष्ट्राच्या भूमीवर देवीदेवतांचे विडंबन कदापि सहन करणार नाही. ‘आदिपुरुष’ चित्रपटात देवीदेवतांचे विडंबन केले असल्याने हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. काही चित्रपट निर्माते सवंग लोकप्रियतेसाठी आणि पैसे जमावण्यासाठी हिंदूंच्या देवतांचे विडंबन करतात. नंतर त्यांचा माफीनामा येतो आणि ते दृश्य वगळण्याची भाषा होते; मात्र समस्त हिंदू समाजाची मागणी आहे की, अशा निर्मात्यांना काही काळासाठी चित्रपटसृष्टीत काम करण्यास प्रतिबंधित केले पाहिजे. चित्रपटातून देवीदेवतांचे विडंबन करून जे कोट्यवधी रुपये उकळू पहात आहेत, अशा चित्रपटांवर आजीवन बंदी आणण्याची आवश्यकता आहे, असे सडेतोड प्रतिपादन भाजपचे आमदार श्री. राम कदम यांनी केले.
नुकताच ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या हिंदी चित्रपटाचा ‘टीझर’ (चित्रपटाचा संक्षिप्त भाग) प्रदर्शित झाला. त्यातील श्रीराम, हनुमान आणि रावण यांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आले आहे. त्याचा निषेध म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बॉलीवूडचा जिहादी चेहरा’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या निर्मितीला विरोध करा ! – महंत पवनकुमारदास शास्त्रीजी, महामंत्री, अयोध्या संत समिती
‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या माध्यमातून केवळ आजच हिंदु धर्मावर आघात झालेला नाही. सहस्रो वर्षांपासून असे आघात होत आले आहेत. कधी पाठ्यपुस्तकांच्या, तर कधी कथा-कादंबर्या आणि आजच्या युगात चित्रपट अन् मालिका यांमधून आघात होत आहेत, जेणेकरून सनातन धर्माच्या मुळांना धक्का लागेल आणि ती नष्ट होतील. हे सर्व जाणूनबुजून केले जात आहे. इतर धर्मियांच्या महापुरुषांचे विडंबन केल्यास त्याचे काय परिणाम होतात, हे सर्वांनी पाहिले आहे. श्रीरामाचे चरित्र जसे आहे, तसेच दाखवले गेले पाहिजे. त्यात पालट करण्याचा अधिकार कुणालाच नाही. त्यामुळेच ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच विरोध होणे आवश्यक आहे. हिंदूंनी संघटित होऊन देवीदेवतांचे विडंबन आणि साधूसंतांचा अवमान रोखणे यांसाठी शासनाला कारवाई करण्यास सांगितले पाहिजे. लहान मुले जे पहातात, त्याचे अनुकरण करतात आणि त्यातूनच त्यांचे चरित्र घडते. याउलट विडंबनात्मक सादरीकरण करणार्याला कुणीही आदर्श मानत नाही. अयोग्य कलाकृतींमुळे जनमानस आंदोलित होते आणि त्यांना वेदना होतात.
हे पहा –
हिन्दू जनजागृति समिति आयोजित ? विशेष संवाद
? चर्चा हिन्दू राष्ट्र की..
? बाॅलीवुड का जिहादी चेहरा : आदिपुरुष सिनेमा
चित्रपटाच्या माध्यमातून हिंदु धर्माला नष्ट आणि भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
खरेतर ब्रह्मदेव हे आदिपुरुष आहेत. प्रभु श्रीराम श्रीविष्णूचे सातवे अवतार आहेत. त्यांना आदिपुरुष संबोधून नवीन पिढीला आधीच्या ६ अवतारांचा विसर पडेल, असे हे हिंदु धर्माला नष्ट आणि भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र आहे. सध्याचे चित्रपट निर्माते सनातन धर्माच्या कल्याणार्थ नव्हे, तर स्वतःचा आर्थिक लाभ करून घेण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट बनवत आहेत. स्व. रामानंद सागर यांनी बनवलेली ‘रामायण’ ही मालिका कोरोना महामारीच्या काळात सर्व प्रकारचे उच्चांक मोडून आबालवृद्धांनी पाहिली. यातून हे स्पष्ट होते की, आजही श्रीराम, हनुमान या देवतांना त्यांच्या मूळ रूपातच पहाणे सर्वजण पसंत करतात. त्यामुळे चित्रपटात कोणताही तर्क नको, तर शास्त्रानुसार योग्य आहे तेच दाखवावे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात