Menu Close

‘हलाल मुक्त दीपावली’च्या मागणीसाठी #Halal_Free_Diwali नावाचा ट्विटर ट्रेंड !

राष्ट्रीय स्तरावर तिसर्‍या स्थानी !

मुंबई – आजच्या काळात जिहादचे विविध प्रकार समोर येत असून त्यातीलच एक गंभीर प्रकार हा ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या रूपाने समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी दिवाळी सणाच्या कालावधीत लागणार्‍या जीवनोपयोगी वस्तूंना ‘हलाल’ प्रमाणित करून ते हिंदूंना घेण्यास बाध्य केले जात आहे. हलालच्या रूपातील ही समांतर अर्थव्यवस्था उलथवून लावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून १७ ऑक्टोबर या दिवशी देशभरातील हिंदूंनी ट्विटरद्वारे #Halal_Free_Diwali नावाचा ट्रेंड करून जागृती निर्माण केली. हा ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर तिसर्‍या क्रमांकापर्यंत पोचला होता. या विषयावर ३० सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या.

? भारत में FSSAI, FCI जैसे प्रमाणन होते हुए भी हलाल सर्टिफिकेशन क्यों ?

? गैर-मुस्लिमों को क्‍यों हलाल सर्टिफाइड उत्पाद खरीदने को बाध्य किया जा रहा है ?

हिन्दुओं, संगठित होकर ‘हलाल मुक्त दीपावली’ अभियान में सम्मिलित होकर #Halal_Free_Diwali मनाने का संकल्प करें – @Ramesh_hjs pic.twitter.com/doHwVT67k4

— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) October 17, 2022

एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटले की, हलाल प्रमाणित उत्पादनांच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांतून हिंदूंची लूट केली जात आहे. या पैशांचा वापर हा राष्ट्रविरोधी कामासाठी करण्यात येत असल्याचे समोर आले होते. ‘अज्ञानापोटी आपण आतंकवादाला प्रोत्साहन तर देत नाही ना ?’, हे पहाण्याची आवश्यकता आहे.

अन्य एकाने म्हटले की, दीपावली हा हिंदूंचा सण असून हलाल प्रमाणित उत्पादने घेण्यापासून हिंदूंना परावृत्त करा !

हलालच्या विरोधात हिंदु जनजागृति समितीचे अभियान !

हिंदु जनजागृति समितीने ‘हलाल मुक्त दीपावली’ या नावाने अभियान चालू केले आहे. हलाल अर्थव्यवस्थेची भयावह वास्तविकता लक्षात घेऊन भारतामध्ये धर्माच्या आधारावर चालू असलेली ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करणारी मागणी करणार्‍या ऑनलाईन हस्ताक्षर अभियानामध्ये सहभागी व्हा, असे समितीकडून हिंदूंना आवाहन करण्यात आले आहे. समितीने या विषयावर ‘हलाल जिहाद ?’ नावाचा ग्रंथही संकलित केला आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *