Menu Close

कोल्हापूर येथे ‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘बर्गरकिंग’ आस्थापनांना निवेदनाद्वारे चेतावणी !

हिंदूंसाठी ‘हलाल’ नसलेले पदार्थ उपलब्ध न केल्यास देशभरात तुमच्या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालू !

बर्गरकिंग आस्थापनातील उपाहारगृहात संबंधितांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – हिंदु समाजासाठी ‘हलाल नसलेले’ पदार्थ उपलब्ध करून द्यावेत; अन्यथा देशभरात तुमच्या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘बर्गरकिंग’ या आस्थापनांच्या उपाहारगृहांत देण्यात आली.

‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘बर्गरकिंग’ या आस्थापनांच्या उपाहारगृहांत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंदूंना सक्तीने ‘हलाल’ पदार्थ खाऊ घालून तुम्ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा आणत आहात. तरी या आस्थापनांनी ‘हलाल’ आणि ‘नॉन हलाल’ असे पदार्थ उपलब्ध असल्याचे सुस्पष्ट शब्दांत सर्वांना दिसेल, अशा प्रकारचा ‘सूचना फलक’ लावण्यात यावा, तसेच ‘मेन्यू कार्ड’(पदार्थांच्या सूचीचे पत्रक) मध्ये ‘हलाल’ आणि ‘नॉन हलाल’ अशी वर्गवारी करून उपलब्ध करून द्यावी.

या प्रसंगी शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी आणि श्री. किरण कुलकर्णी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय आरेकर, बजरंग दलाचे श्री. विनायक आवळे, शिवसेनेचे श्री. प्रभाकर थोरात, सरनोबतवाडी येथील धर्मप्रेमी श्री. अभिषेक मोकाशी आणि तनिष्क साळोखे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे आणि श्री. बाबासाहेब भोपळे, भुयेवाडी येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी सर्वश्री रवी खोचीकर, प्रकाश चौगले, उमेश जगताप, संदीप पाटील, विजय पाटील, शिवसेनेचे युवासेना तालुका समन्वयक श्री. रमेश पाटील आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. दशरथ शिंदे उपस्थित होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *