‘हलाल’ उत्पादनांच्या सक्तीविरोधात सोलापूर येथे आंदोलन !
सोलापूर, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – मागील ६ मासांपासून विविध आंदोलने, बैठका आणि निवेदने यांच्या माध्यमातून हलाल प्रमाणित उत्पादनांचा विरोध केला जात आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ‘हलाल जिहाद’च्या विरोधातील ही चळवळ आता तीव्र करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. बापूसाहेब ढगे यांनी केले. हलाल सक्तीच्या विरोधात जिल्हा परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या समोर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. सुरज मदनावाले, धर्मप्रेमी श्री. ऋतुराज अरसिद, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके, श्री. मिनेश पुजारे यांनीही मनोगत व्यक्त केले. आंदोलनाला उद्योजक श्री. शिवराज पडशेट्टी, श्री. यशपाल चितापुरे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दत्तात्रय पिसे, संदीप ढगे, रमेश पांढरे यांसह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी स्वीकारले.
हलाल उत्पादनांची सक्ती मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल ! – अर्जुनसिंह शिवसिंगवाले, श्रीराम युवा संघटना
हिंदुविरोधी असलेला ‘हलाल जिहाद’ प्रचंड वेगाने पसरत आहे. त्यामुळे हलाल उत्पादनांची सक्ती मागे घेतली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. ‘हलाल’चे चिन्ह असलेल्या उत्पादनांवर सर्व हिंदूंनी बहिष्कार घालावा.
क्षणचित्रे
१. आंदोलनाच्या ठिकाणी येणारे जाणारे लोक आंदोलनाचा विषय स्वतःहून जाणून घेत होते.
२. आंदोलनाच्या ठिकाणी ‘हलाल जिहाद’च्या ग्रंथांचा कक्ष लावण्यात आला होता. या कक्षाला पोलिसांनी भेट देऊन विषय जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
३. निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी ‘हलाल जिहाद’ हा विषय पूर्ण समजून घेतला.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात