Menu Close

(म्हणे) ‘गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘जिहाद’ शिकवला !’

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांचे संतापजनक विधान !

  • सर्व स्तरांवरून विरोध होऊ लागल्यावर दिले हास्यास्पद स्पष्टीकरण !

  • जर हिंदूंना जिहाद शिकवण्यात आला असता, तर जसे महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर धर्मांध मुसलमान हिंदूंचा शिरच्छेद करत आहेत, तसे प्रतिदिन हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणार्‍यांना हिंदूंनीही यमसदनी धाडले असते !
  • हिंदूंमध्ये जिहादची शिकवण असती, तर शिवराज पाटील असे विधान करू धजावले असते का ?
  • हिंदूंमधील संघटनाच्या अभावापायीच कुणीही उठतो आणि त्यांच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक करतो, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • मुसलमानप्रेमाच्या नावाखाली काँग्रेसच्या अशा हिंदुद्रोही वृत्तीमुळेच ती नामशेष होत आहे, हे तिने लक्षात ठेवावे ! आता पाटील यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी ! -संपादक 

नवी देहली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी ‘जिहाद केवळ इस्लाममध्येच नाही, तर श्रीमद्भगवद्गीता आणि ख्रिस्ती धर्मातही आहे’, असे संतापजनक विधान केले आहे. गीतेच्या एका भागामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवल्याचे ते म्हणाले. यावरून भाजपसह अनेकांकडून निषेध नोंदवण्यास आरंभ झाल्यावर पाटील यांनी त्यांच्या संतापजनक विधानावर स्पष्टीकरण दिले.

सौजन्य नवभारत टाइम्स 

१. देहलीत २० ऑक्टोबर या दिवशी माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या वेळी शिवराज पाटील म्हणाले, ‘‘इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेच्या संदर्भात अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल, तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे. (असे आहे, तर शिवराज पाटील आणि काँग्रेस यांचा इस्लामिक स्टेट, बोको हराम, तालिबान, लष्कर-ए-तैयबा आदी जिहादी आतंकवादी संघटना यांना पाठिंबा आहे, हेच सिद्ध होत नाही का ? – संपादक) केवळ कुराणच नव्हे, तर महाभारतातील गीतेमध्ये आणि ख्रिस्ती धर्मातही हेच सांगितले आहे.’’

२. या कार्यक्रमाच्या वेळी काँग्रेसचे नेते शशी थरूर, सुशीलकुमार शिंदे आणि मणीशंकर अय्यर हेही उपस्थित होते.

३. पाटील यांच्या विधानाला सर्वच स्तरांवरून टीका होऊ लागल्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांना तुम्ही जिहाद म्हणाल का? नाही ना ? हेच मी सांगत होतो.

काँग्रेसने हिंदुद्वेषाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत ! – भाजप

पाटील यांच्या विधानावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. ‘काँग्रेसने हिंदुद्वेषाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. काँग्रेस स्वतःला ‘जानवेधारी हिंदूं’चा पक्ष असल्याचा दावा करते; परंतु राममंदिराला विरोध करणे, रामाच्या अस्तित्वावर प्रतिज्ञापत्र प्रविष्ट करून प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणे, ‘हिंदु आतंकवाद’ असे संबोधणे, हिंदुत्वाची तुलना इस्लामिक स्टेटशी करणे, यावरून काँग्रेसचा हिंदुद्वेष अधोरेखित होतो. अशा प्रकारची विधाने गुजरात निवडणूक पाहून केली जात आहेत. गुजरातची जनता त्यांना चांगलाच धडा शिकवेल.’’

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *