सांगली – ज्यावर ‘हलाल’चा शिक्का आहे, तीच वस्तू मुसलमानांनी घ्यावी, असा प्रचार करण्यात येत आहे. तरी यापुढील काळात हिंदूंनीही तितकीच प्रबळ इच्छाशक्ती दाखवत, अशी उत्पादने घेता कामा नयेत. याच समवेत हिंदु उत्पादकांनी कोणत्याही परिस्थितीत ‘हलाल’चे प्रमाणपत्र घेता कामा नये. दीपावलीच्या निमित्ताने हिंदूंनी कोणत्याही परिस्थितीत ‘हलाल’चे कोणतेही उत्पादन घेणार नाही, असा ठाम निश्चय करावा आणि अंत:करणातील देशभक्ती प्रत्यक्षात उतरवावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची भेट घेऊन त्यांना ‘हलाल जिहाद’ विषयीची मोहीम, तसेच ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाविषयी माहिती दिली असता पू. भिडेगुरुजी यांनी हे आवाहन केले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई, तसेच कु. प्रतिभा तावरे उपस्थित होत्या.
‘हलालमुक्त दीपावली’च्या पू. भिडेगुरुजी यांच्या आवाहनास समस्त हिंदूंनी प्रतिसाद द्यावा ! – श्री. मनोज खाड्ये, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी सर्व हिंदूंना ‘हलालमुक्त दीपावली’ साजरी करावी असे आवाहन केले आहे. या आवाहनास हिंदूंनी प्रतिसाद द्यावा; कारण ‘हलाल’ हा हिंदूंवर लादलेला ‘जिझिया कर’ आहे. ‘हलाल’ हे जागतिक पातळीवरील षड्यंत्र असून ते हिंदूंनी मोडून काढावे, असे आवाहन मी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करतो.
‘राष्ट्र आणि धर्म’ प्रसाराचे ‘सनातन प्रभात’चे कार्य कौतुकास्पद ! – पू. भिडेगुरुजी‘राष्ट्र आणि धर्म’ प्रसाराचे ‘सनातन प्रभात’चे कार्य कौतुकास्पद आहे. हे कार्य अत्यंत तळमळीने कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या कार्यात हिंदूंनी सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन पू. भिडेगुरुजी यांनी याप्रसंगी केले. |
स्रोत: दैनिक सनातन प्रभात