Menu Close

गेल्या ८ वर्षांमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोगाव्या लागलेल्या दु:खदायक आणि वेदनादायक घटना !

  • हिंदु साधू-संतांवर ब्रिटिशांच्या काळातही झाले नाहीत, असे अत्याचार तत्कालीन काँग्रेसप्रणीत आतंकवादविरोधी पथकाने केले !

  • हे वाचून ज्या हिंदूंचे रक्त सळसळत नाही, ते हिंदू नव्हेतच !

sadhvi_pradnya

१. साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांच्या अटकेच्या आधी १३ दिवस आतंकवादविरोधी पथकाच्या (एटीएसच्या) अधिकार्‍यांनी त्यांना डांबून ठेवले.

२. साध्वी यांच्या पावित्र्याविषयी अर्वाच्च्य भाषा वापरली. त्यांना अश्‍लील चित्रफीती दाखवण्यासारखे घृणास्पद प्रकार आतंकवादविरोधी पथकाने केले.

३. पोलिसांनी साध्वी यांना कंबरपट्ट्याने बेशुद्ध पडेपर्यंत झोडपले. त्या अनेकवेळा बेशुद्ध पडल्या.

४. त्यांचा केलेला छळ एवढा असह्य होता की, त्यांना आत्महत्याच करावीशी वाटत होती.

५. अधिकारी खानविलकर आणि त्यांच्या गटाने साध्वी यांना रात्रंदिवस प्रचंड मारहाण केली.

६. साध्वींच्या शिष्य भीमभाई याला साध्वींना मारण्यास भाग पाडण्यात आले.

७. साध्वींचा अधिवक्ता, नातलग इत्यादी कोणाचाही पोलिसांनी साध्वींशी संपर्क होऊ दिला नाही.

८. छळसत्रामुळे साध्वी प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या. अन्नपाणीही जात नव्हते. मूत्राशयाचा त्रास होत होता. त्यातच त्यांना कर्करोगही झाला.

९. प्रसारमाध्यमांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना हिंदु आतंकवादी ठरवले; परंतु त्या अनेक दिवस रुग्णालयात असल्याचे वृत्त एकाही वृत्तवाहिनीने जनतेपर्यंत पोचवले नाही.

१०. त्या बेशुद्ध असतांना कोठडीत मनःस्थिती ठीक नसतांना काही कागदांवर त्यांच्या स्वाक्षर्‍याही घेण्यात आल्या.

११. साध्वींच्या गुरूंना शिवीगाळ करून त्यांना अपमानित केले.

१२. साध्वी निर्दोष सुटतील, असे भय वाटत असल्यामुळे २००८ प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची टाळाटाळ काँग्रेसच्या काळात एन्.आय.ए.ने केली.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *