Menu Close

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ख्रिस्ती कुटुंबाने हिंदु कुटुंबाच्या घरासमोरील रांगोळी पुसून पणतीला लाथ मारली !

  • हिंदु संघटनांच्या आंदोलनानंतर गुन्हा नोंद !

  • आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनी पाळायचा आणि अन्य धर्मियांनी हिंदूंवर धर्माच्या आधारे आक्रमण करत रहायचे, हे आता थांबलेच पाहिजे. यासाठी हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध केला पाहिजे ! – संपादक 

प्रसारमाध्यमांना माहिती देतांना श्री. चेतन गाडी

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील आर्.टी.सी. क्रॉस रस्त्यावरील अर्चना अपार्टमेंटमध्ये एका हिंदु कुटुंबाने २५ ऑक्टोबर या दिवाळीच्या दिवशी घराच्या दाराबाहेर रांगोळी काढली होती. त्यांच्या घराच्या समोर एक ख्रिस्ती कुटुंब रहाते. त्यांनी रांगोळीचा विरोध करत ती पुसण्यास सांगितले. हिंदु कुटुंबाने विरोध केल्यावर ख्रिस्ती कुटुंबातील लोकांनी रांगोळी पुसली आणि तेथे लावलेल्या पणतीला लाथ मारली. तसेच ख्रिस्ती महिलेने हातात चपला घेऊन मारहाण करण्याची धमकीही दिली. या वेळी या महिलेचा मुलगाही हिंदूंना शिवीगाळ करत होता. या घटनेचा व्हिडिओ लगेच सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर हिंदु संघटनांनी या इमारतीच्या बाहेर रात्री ८ ते १२ पर्यंत आंदोलन केल्यावर पोलिसांनी ख्रिस्ती कुटुंबावर गुन्हा नोंदवला. या आंदोलनामध्ये हिंदु जनजागृती समितीचे तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चेतन गाडी हे सहभागी झाले होते.

१. हिंदु संघटनांचे कार्यकर्ते आंदोलन करत असतांना पोलीस तेथे उपस्थित झाले आणि त्यांनी ख्रिस्ती कुटुंबाच्या विरोधात गुन्हा नोंदवल्याचे सांगितले. या वेळी कार्यकर्त्यांनी त्यांना गुन्हा नोंद करण्यात आल्याची प्रत दाखवण्याची मागणी केल्यावर पोलिसांनी ते नाकारले. नंतर त्यांच्यावर दबाव टाकल्यावर पोलिसांनी ३ कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेले आणि त्यांनी गुन्ह्याची प्रत दाखवली. या वेळी हिंदूंनी ख्रिस्ती कुटुंबावर कलम २९५ आणि २९५ अ लावण्याची अन् त्यांना अटक करण्याची मागणी केली.

आंदोलनात सहभागी हिंदू

२. यानंतर दुसर्‍या दिवशी हिंदु कार्यकर्ते पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी कलम २९५ आणि २९५ अ त्यात अंतर्भूत केल्याचे सांगितले. जी.ए. ख्रिस्तोफर (वय ६८ वर्षे), रजीव अब्राहम (वय ३६ वर्षे) आणि अजित (वय ३४ वर्षे) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *