Menu Close

(म्हणे) ‘हिंदू रचत आहेत भारतातील २० कोटी मुसलमानांच्या नरसंहाराचे षड्यंत्र !’

अमेरिकेतील इस्लामी संघटनांकडून हिंदुविरोधी विखारी प्रचार

  • भारतात आतंकवाद, दंगली, लव्ह जिहाद आदी हिंसक घटना घडवून हिंदूंचा नरसंहार कोण करत आहे, हे जगजाहीर आहे ! याकडे अशा संघटना जाणूनबुजून कानाडोळा करतात आणि ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ यानुसार हिंदुविरोधी प्रचार करून हिंदूंना अपकीर्त करतात !
  • या अपप्रचाराला भारतातील मुसलमान उत्तर देतील का ? -संपादक 

मिनेपोलीस (अमेरिका) – अमेरिकेतील इस्लामी संघटना हिंदूंविषयी द्वेष पसरवणारे आणि त्यांना लक्ष्य करणारे कार्यक्रम आयोजित करत आहेत. ‘अमेरिकेला धार्मिक आतंकवाद्यांच्या घुसखोरीपासून वाचवणारी आणि तिचे रक्षण करणारी आघाडी’ (अलायन्स टू सेव्ह अँड प्रोटेक्ट अमेरिका फ्रॉम इन्फिलट्रेशन बाय रिलिजस एक्स्ट्रीमिस्ट्स – ए.एस्.पी.ए.आय.आर्.ई.) ही इस्लामी संघटना ‘वेकिंग अप अमेरिका टूर’ या उपक्रमाच्या माध्यमातून हिंदुविरोधी विखारी प्रचार करत आहे. असाच एक कार्यक्रम ६ नोव्हेंबर या दिवशी ‘इस्लामिक सेंटर ऑफ मिनेसोटा’ येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या ऑनलाइन पोस्टवर ‘अमेरिकेत सर्वांत वेगाने वाढणारा इस्लामद्वेषाचा धोका आणि भारतातील २० कोटी मुसलमानांच्या नरसंहाराचे षड्यंत्र रचणारे हिंदुत्व’ असा हिंदुविरोधी मजकूर लिहिला आहे.

‘ए.एस्.पी.ए.आय.आर्.ई.’ ही इस्लामी संघटना हिंदू आणि ज्यू यांच्या विरोधात द्वेष पसरवण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. या संघटनेच्या कार्यक्रमाच्या ऑनलाइन पोस्टमध्ये मुख्य वक्ते म्हणून सिराज वहाज, डॉ. शेख उबेद आणि शेख अहमद म्बरेक यांची नावे आहेत. या कार्यक्रमाला दुजोरा देतांना शेख उबेद यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, मुसलमान, ख्रिस्ती, दलित आणि शीख इत्यादींवर खटला चालवणार्‍या हिटलरप्रेमी हिंसक ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’सारख्या धार्मिक आतंकवाद्यांच्या घुसखोरीच्या धोक्याविषयी अमेरिकेला जागृत करा. ते भारतातील २० कोटी मुसलमानांच्या नरसंहाराचे षड्यंत्र रचत आहेत. या कार्यक्रमाचा दुसरा एक वक्ता सिराज वहाज हा जागतिक संबंध असलेला कुख्यात इस्लामी नेता आहे.

आयोजकांवर कारवाई करा ! – अमेरिकेतील हिंदू

अमेरिकेतील हिंदु समुदायाने देशात चालू असलेला हा विखारी इस्लामी प्रचार थांबवण्याची आणि आयोजकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *