Menu Close

मुंबई : अंमली पदार्थांचा डोस देऊन अल्ताफ मर्चंटने अभिनेत्रीवर केला बलात्कार

rape

मुंबई : अंमली पदार्थांचा डोस देऊन आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप मालाड परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय अभिनेत्रीने केला आहे. याप्रकरणी अल्ताफ मर्चंट नावाच्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १० महिन्यांपासून तो अत्याचार करत असल्याचे ‌अभिनेत्रीने तक्रारीत म्हटले आहे.

मूळची देहरादूनची असलेली ही अभिनेत्री २०१३ मध्ये चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी मुंबईला आली. यादरम्यान तिची ओळख अल्ताफशी झाली. त्याने ओळखीच्या निर्मांत्यांमार्फत चित्रपटांत काम देण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी जवळीक साधली. याच दरम्यान २०१४ मध्ये अल्ताफने वांद्रे येथील स्वतःच्या घरी पार्टीमध्ये या अभिनेत्रीला अंमली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडले. त्यानंतर ती नशेत असल्याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत त्याला जाब विचारला असता, त्याने लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वारंवार तो अंमली पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार करत होता.

२०१४ मध्ये अल्ताफच्या कपाटात अनेक महिलांचे क्रेडिट व डेबिटकार्ड आढळले. त्यावेळी लग्नाबाबत विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानतंर फसवणूक झाल्याचे समजल्यावर मानसिक तणावाने ही अभिनेत्री कुटुंबियांकडे देहरादूनला गेली. परंतु परत येऊन तिने शनिवारी अल्ताफविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. वांद्रे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडीत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धर्मराज प्रभाले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *