Menu Close

दुमका (झारखंड) येथे विवाहित हिंदु महिलेची धर्मांध मुसलमानांनी हत्या केल्याचे उघड

मृत विवाहित हिंदु महिलेची मुन्ना मियाँ नावाच्या धर्मांध मुसलमानाने हत्या केल्याचे उघड झाल्यावर जमलेला जमाव

दुमका (झारखंड) – येथे यावर्षी ३१ ऑगस्टला झुडपात सापडलेल्या महिलेच्या अर्ध्या जळालेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत विवाहित हिंदु महिलेची मुन्ना मियाँ नावाच्या धर्मांध मुसलमानाने हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणातून मुन्ना मियाँसह त्याचा भाऊ आणि वडील यांचाही या हत्येत सहभाग असल्याचे समोर आले आहे. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर महिलेचा गळा आवळून, तसेच तिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आली होती. २ नोव्हेंबर या दिवशी मुन्ना मियाँला पोलिसांनी अटक केली.

विशेष म्हणजे या वर्षी ऑगस्ट मासात दुमका येथेच शाहरुख नावाच्या युवकाने अंकिता नावाच्या हिंदु मुलीला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळले होते. झोपलेल्या अंकिताच्या खोलीत त्याने खिडकीतून पेट्रोल ओतून आग लावली होती. त्यानंतर काही दिवसांनी १९ वर्षीय अंकिताचा रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू झाला होता.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *