मुसलमानांसाठी मंदिर झाकण्याची वेळ यायला हा भारत आहे कि पाक ?
पुणे : येथील गंजपेठेत असणार्या सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी १४ मे या दिवशी सायंकाळी मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटलेल्या मुसलमानांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम होत असतांना पोलिसांनी कार्यक्रमस्थळाच्या जवळच असलेले एक शिवमंदिर मात्र पांढर्या कापडाने झाकून ठेवले होते. (पोलिसांनी मंदिर झाकण्यामागे मुसलमानांच्या जमावाकडून मंदिराला हानी पोहोचवली जाण्याची भीती होती का ? कि मुसलमानांच्या भावना सांभाळण्यासाठी जाणीवपूर्वक पोलिसांनी ही कृती केली ? कायदा-सुव्यवस्था बिघडवणार्यांवर कारवाई न करता त्यांच्या भीतीपोटी पोलिसांकडून हिंदूंच्या श्रद्धास्थानांची मानहानी करणे कितपत योग्य ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या संदर्भात काही प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी सांगितलेली माहिती अशी,
१. या शिवमंदिरात नित्यनेमाने पूजाअर्जा होते. मुसलमानांच्या कार्यक्रमासाठी मंदिर झाकून ठेवण्याचे काय कारण ? दुसर्या दिवशी मंदिरावरील कापड काढून टाकण्यात आले होते.
२. मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
३. कार्यक्रमासाठी येणार्या अन्य धर्मीय व्यक्तींचे पोलिसांकडून नाव, संपर्क क्रमांक टिपून घेण्यात येत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात