Menu Close

वादग्रस्त विनोदी कलाकार वीर दास यांचा बेंगळुरू येथील कार्यक्रम रहित !

हिंदूंच्या संघटित लढ्याचा परिणाम !

  • हिंदूंनो, या यशाविषयी ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !
  • हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान करणार्‍यांचे कार्यक्रम हिंदूंकडूनच आयोजित केले जातात, हे हिंदूंना लज्जास्पद आहे. ज्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये ईशनिंदेच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा आहे, तशी शिक्षा असणारा कायदा भारतातही असणे आता आवश्यक आहे. तरच हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान रोखला जाईल ! -संपादक 
वादग्रस्त विनोदी कलाकार वीर दास

बेंगळुरू (कर्नाटक) – मल्लेश्‍वरम् येथील चौडय्या मेमोरियल हॉलमध्ये ११ नोव्हेबर या दिवशी होणारा वादग्रस्त विनोदी कलाकार वीर दास याचा ‘वीर दास कॉमेडी शो’ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या विरोधामुळे रहित करण्यात आला. वीर दास याने यापूर्वी हिंदु धर्म, हिंदु महिला आणि भारत यांचा अपमान केला होता. आताच्या कार्यक्रमाविषयी हिंदु जनजागृती समिती आणि श्रीराम सेना यांनी वैयाल कावल पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. यासह हिंदु जागरण वेदिकेकडून १० नोव्हेंबरला आंदोलन करण्यात आले. अशा प्रकारे हिंदूंनी दिलेल्या संघटित लढ्यामुळे चौडैय्या मेमोरिअल हॉलचे पदाधिकारी आणि आयोजक यांनी हा कार्यक्रम रहित केला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *