Menu Close

बांगलादेशमध्ये ७५ धर्मांधांचे ३८ हिंदूंवर प्राणघातक आक्रमण !

२ हिंदु महिलांवर बलात्कार !

बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांची कोणतीही माहिती भारत शासन घेत नाही, तसेच त्यांना साहाय्य करत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

bangladesh_hinduढाका (बांगलादेश) : बांगलादेशमधील विजयनगरजवळील एरियाल गावात स्थानिक निवडणुकीत हरलेल्या अवामी लीग पक्षाच्या उमेदवाराने ७५ धर्मांधांच्या साहाय्याने गावातील ३८ हिंदूंवर प्राणघातक शस्त्रे आणि बंदुका यांद्वारे ७ मे या दिवशी आक्रमण केले. धर्मांधांनी हिंदूंच्या घरात बलपूर्वक घुसून त्यांची रोख रक्कम आणि दागिने लुटले, लहान मुलांना आगीत ढकलले, तसेच २ हिंदु महिलांवर बलात्कार केले. धर्मांधांच्या या आक्रमणात अनेक हिंदु गंभीर घायाळ झाले असून त्यांची १७ लक्ष रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे. बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी ही माहिती दिली.

bangladesh_hindu1

१. एरियाल या गावात स्थानिक निवडणूक लढवणारे अवामी लीगचे नेते हाजी अख्तर हुसेन हे विरोधी उमेदवार झिया उल् हक बकुल यांच्याकडून पराभूत झाले.

२. या निवडणुकीत हिंदूंनी बकुल यांना मते दिल्याचा राग मनात ठेऊन अख्तर हुसेन यांनी वरील आक्रमण घडवून आणले, असे पीडित हिंदूंनी अधिवक्ता रवींद्र घोष यांना सांगितले.

३. हिंदूंनी या आक्रमणाची तक्रार विजय नगर पोलीस ठाण्यात ८ मे या दिवशी नोंदवली आणि घटनेची माहिती बांगलादेश मायनॉरीटी वॉच या संघटनेस दिली.

४. अधिवक्ता रवींद्र घोष यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पीडितांचे गार्‍हाणे लिहून घेतले.  त्यांनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुस्तफा कमाल पाशा यांची भेट घेतली. या प्रकरणी केवळ २ धर्मांधांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी अधिवक्ता घोष यांना दिली.

५. अधिवक्ता घोष यांनी या भागाचे खासदार ओबेदुल चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्या समोर मांडली. खासदारांनी घटनास्थळी भेट देऊन पीडितांना आर्थिक साहाय्य केल्याचे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *