Menu Close

सागर (मध्यप्रदेश) येथे सरकारी शिक्षक शमीम याने हिंदु महिलेचे केले धर्मांतर !

पीडित महिलेच्या मुलीचाही विनयभंग आणि धर्मांतरासाठी दबाव

अशा घटना प्रतिदिन घडत आहेत. यातून धर्मांध मुसलमानांच्या षड्यंत्राची व्याप्ती लक्षात येते. त्यामुळे सरकारने अशांना फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी कुणी केल्यास त्यात चुकीचे काय ? – संपादक 

सागर (मध्यप्रदेश) – येथील देहरा गावातील सरकारी शाळेत शिक्षक असणार्‍या शमीम याच्या विरोधात एका हिंदु महिलेचे धर्मांतर करण्यासमवेत तिच्या अल्पवयीन मुलीकडे वाईट दृष्टीने पाहिल्याच्या आणि तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी ११ नोव्हेंबरला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शाळेने शमीम याला निलंबित केले आहे.

१. संबंधित १७ वर्षीय मुलीने आरोप केला आहे की, तिची आई शमीमच्या घरी जेवण बनवण्यासाठी जात होती. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने शिक्षक शमीमने स्वत:हून मुलीच्या आईला कामावर ठेवले आणि फसवून तिचे धर्मांतर केले.

२. २९ ऑक्टोबर या दिवशी शमीमने पीडितेच्या घरी जाऊन तिला स्वत:समवेत घेऊन जाण्यासाठी दबाव आणला. तेव्हा त्याने तिचा विनयभंगही केला. यानंतर अल्पवयीन पीडितेने तिच्या वडिलांना सर्व घटनाक्रम सांगितला. यामुळे वडिलांनी पोलीस, तसेच राज्य बाल संरक्षण आयोगाकडे तक्रार प्रविष्ट केली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *