Menu Close

क्रूर अफझलखानाला सुफी संत बनवण्यासाठी कबरीचे झालेले उदात्तीकरण रोखणार्‍या सरकारचे धन्यवाद – ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे

ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे

पुणे – अफझलखानाचा इतिहास पहाता त्याची क्रूरता, धर्मांधता आणि कपटी वृत्ती लक्षात येते. अशी व्यक्ती कधीही आदर्श असू शकत नाही. अशा अफझलखानाचा वध करून प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याची कबर बांधण्यात आली होती. नंतर काही विशिष्ट समाजाने अफझलखानाला सुफी संत दाखवण्याचा प्रयत्न चालवला होता. त्या ठिकाणी मोठी वास्तू उभी करण्यात आली होती. याविरुद्ध अनेक शिवभक्तांनी अप्रसन्नता व्यक्त केली होती. याविरोधात काही जण न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने ते बांधकाम अवैध असल्याचा आदेश दिला होता; परंतु तत्कालीन सरकार सक्षम नसल्याने न्यायालयाच्या निर्णयाची कार्यवाही झाली नव्हती. १० नोव्हेंबरला वर्तमान सरकारने अवैध बांधकाम उद्ध्वस्त केले, त्याचे मी स्वागत करतो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानासारख्या कपटी माणसाचा वध केला. त्याचे शीर जिजाऊ मासाहेबांना पाठवले. त्याचे उर्वरित धड त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी पुरून कबर बांधली. ही कबर म्हणजे महाराजांच्या पराक्रमाची साक्ष आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *