उज्जैन : नेपाल हिंदु राष्ट्र पुनर्स्थापना मंचचे श्री. बिष्णु प्रसाद बराल यांनी ८ मे २०१६ या दिवशी सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिली.
१८ मे २०१६ या दिवशी उज्जैन येथील सिंहस्थ क्षेत्री नेपाळला हिंदु राष्ट्र करण्यासाठी नेपाल हिंदु राष्ट्र पुनर्स्थापना मंचकडून संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठीही हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले. या वेळेस समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांना हिंदु राष्ट्र ल्याऊ – नेपाल बचाऊ याची प्रतिमा भेट देण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात